राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी राहुल द्रविड 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 July 2019

अकादमीतील क्रिकेटशी निगडीत सर्व गोष्टींवर द्रविडचे नियंत्रण असेल. पुरुष आणि महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकांच्याबरोबरीने तो काम करेल. त्याचबरोबर भारत अ, 19 वर्षांखालील, 23 वर्षांखालील या संघांच्या बांधणीसाठी देखील द्रविडचे योगदान राहिणार आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी ही घोषणा केली. 

"बीसीसीआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ही माहिती दिली. अकादमीतील क्रिकेटशी निगडीत सर्व गोष्टींवर द्रविडचे नियंत्रण असेल. पुरुष आणि महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकांच्याबरोबरीने तो काम करेल. त्याचबरोबर भारत अ, 19 वर्षांखालील, 23 वर्षांखालील या संघांच्या बांधणीसाठी देखील द्रविडचे योगदान राहिणार आहे.

या संघांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार करण्याची जबाबदारी देखील त्याच्यावर राहणार आहे. राष्ट्रीय अकादमीबरोबर कुमार संघांसोबत राहण्यासाठी तो भारत अ आणि 19 वर्षांखालील संघांच्या प्रत्येक दौऱ्यावर सोबत असेल. त्याचबरोबर पार म्हांब्रे आणि अभय शर्मा अनुक्रमे अ आणि 19 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याचेही "बीसीसीआय'ने स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI appoints Rahul Dravid as Head of Cricket at NCA