WPL 2023 GG vs MI : बीसीसीआयने ऐनवेळी मुंबई - गुजरात सामन्याचं टायमिंग बदललं

WPL 2023 GG vs MI
WPL 2023 GG vs MI esakal

WPL 2023 GG vs MI : बीसीसीआयची महत्वकांक्षी लीग वुमन प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) पहिल्या हंगामाची सुरूवात आजपासून (दि. 04) मुंबईत सुरू होत आहे. पहिलाच सामना हा मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. आधी बीसीसीआयने हा सामना सायंकाळी 7.30 ला सुरू होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र सामना सुरू होण्यासाठी काही तासच शिल्लक असताना या सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे.

WPL 2023 GG vs MI
IND vs AUS : भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ! तपासणीसाठी बोलावले बॉम्बपथक

गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता 7.30 ऐवजी रात्री 8 ला सुरू होणार आहे. सामन्याची नाणेफेक ही 7.30 ला होईल. बीसीसीआयने अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. या सामन्यापूर्वी डी. वाय. पाटील स्टेडियमवर उद्घाटन सोहळा देखील होणार आहे.

प्रेक्षकांसाठी स्टेडियमची दारे सायंकाळी 4 वाजता उघडण्यात आली आहेत. ते ऐतिहासिक अशा WPL च्या पहिल्या हंगामाची धडाक्यात होणारी सुरूवात प्रत्यक्ष पाहू शकणार आहे. WPL 2023 चा उद्घाटन सोहळा हा सायंकाळी 6.25 ला सुरू होणार आहे. यात बॉलीवूड तारका कियारा अडवाणी आणि कृती सनोन आपली कला सादर करणार आहे. तर गायक एपी ढिल्लो देखील उद्घाटन सोहळ्याला आपल्या आवाजाने चार चांद लावेल.

WPL 2023 GG vs MI
WPL 2023 : धारावीच्या गल्लीत खेळणारी सिमरन थेट जागतिक क्रिकेटपटूंना भिडणार

वुमन्स प्रीमियल लीगचा पहिलाच सामना हा मुंबई इंडियन्स आणि गुजार जायंट्स यांच्यात होत असल्याने लीगची धडाक्यात सुरूवात होईल. या सामन्याकडे अदनी विरूद्ध अंबानी अशा नजरेतून देखील पाहिले जात आहे.

गुजरातचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी करणार आहे. तर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हे भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर करत आङे. मुंबईमध्ये अमेलिया केर, नतालिया सिवर आणि हेले मॅथ्यूज सारख्या तगड्या खेळाडू आहेत. तर गुजरातकडे अॅश्ले गार्डनर, स्नेह राणा यांचा समावेश आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com