"ड्रॉप केलं... त्यांचे दरवाजे कायमचे बंद नाही झाले"

Ajinkya Rahane And Cheteshwar Pujra
Ajinkya Rahane And Cheteshwar PujraSakal

भारतीय संघातील अनुभवी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujra) यांना कसोटी संघातून डच्चू मिळाला आहे. त्यांना श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून ड्रॉप केलं असले तरी त्यांचे दरवाजे कायमचे बंद झालेले नाहीत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी दिली आहे. जलदगती गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) ला देखील संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव झाल्यानंतर वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा केली होती. "दोन कसोटी सामन्यांसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले होते. ज्या खेळाडूंना संधी दिली आहे ते कशी कामगिरी करतात ते पाहिले जाईल. आम्ही कोणाचेही दरवाजे बंद केलेले नाहीत. क्रिकेटमध्ये तुम्ही किती धावा करता किंवा किती विकेट्स घेता ही गोष्ट महत्त्वाची आहे."

Ajinkya Rahane And Cheteshwar Pujra
Wriddhiman Saha नं द्रविडबद्दलही फोडला बॉम्ब

ते पुढे म्हणाले की, चाही खेळाडूंना रणजीमध्ये आपली क्षमता सिद्ध करण्यास सांगितले होते. भारतीय संघ निवड करताना रणजीतील कामगिरीवर लक्ष असेल. निवड समितीचे सदस्य प्रत्येक सामना पाहत आहेत. खेळाडूंच्या कामगिरी बारकाईनं पाहिली जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. रहाणे आणि पुजारा दोन्ही खेळाडू धावांसाठी संघर्ष करत होते. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणे आणि पुजाराने सहा डावात प्रत्येकी एक-एक अर्धशतक केले. अजिंक्यनं डिसेंबर 2020 मध्ये तर पुजाराच्या भात्यातून जानेवारी 2019 मध्ये शतकी खेळी पाहाला मिळाली होती. रणजी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अजिंक्यनं शतकी खेळी केली. दुसरीकडे पहिल्या डावात खातेही उघडू न शकलेल्या पुजाराने दुसऱ्या डावात 91 धावा केल्या.

Ajinkya Rahane And Cheteshwar Pujra
IND vs SL : अजिंक्यला सेंच्युरी करुनही ठेंगा; पुजाराही आउट

अजिंक्य रहाणे आणि पुजाराला संघाबाहेर काढण्याचा निर्णय हा एका रात्रीत झालेला नाही. बीसीसीआय निवड समितीने खूप विचार करुन यासंदर्भात निर्णय घेतला आहे. एखादा खेळाडू शतकी खेळी करतो त्यावेळी त्याच्याकडून द्विशतकाची अपेक्षा असते, असे सांगत अजिंक्य रहाणे संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू असल्याचा उल्लेखही चेतन शर्मा यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com