IND vs SL : अजिंक्यला सेंच्युरी करुनही ठेंगा; पुजाराही आउट

Ajinkya Rahane And Cheteshwar Pujara
Ajinkya Rahane And Cheteshwar Pujara esakal

श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. किंग कोहलीनंतर कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे आले आहे. याशिवाय घरच्या मैदानावर बुमराह उप कर्णधार म्हणून मिरवणार आहे. बीसीसीआय निवड समितीने रणजी ट्रॉफी स्पर्धेत शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) ठेंगा दाखवला असून चेतेश्वर पुजारालाही (Cheteshwar Pujara) दणका दिला आहे. दोघांनाही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. (Rahane and Cheteshwar Pujara have been dropped from India's Test squad for the home series against Sri Lanka)

मागील काही सामन्यांपासून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सातत्याने अपयशी ठरत होते. रणजी सामन्यात कामगिरी करा आणि मग टीम इंडियात स्थान मिळवा, असा इशारा बीसीसीआय निवड समितीसह अध्यक्ष सौरव गांगुली याने या दोघांना दिला होता. अजिंक्य रहाणेनं दमदार कामगिरीही केली. पण एवढे पुरे नाही. सातत्य राखले तरच टीम इंडियाचे दरवाजे खुले होतील, असे संकेत बीसीसीआयने या जोडगोळीला दिले आहेत.

Ajinkya Rahane And Cheteshwar Pujara
बुमराहची हवा; वनडेनंतर आता टी-20 सह कसोटी संघाचा उपकर्णधार

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नं सौराष्ट्र विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 290 चेंडूत 17 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 129 धावा केल्या होत्या. दुसरीकडे चेतेश्वर पुजाराने याच सामन्यात निराशजनक कामगिरी केली. 4 चेंडूचा सामना करुन पुजारा खातेही न उघडता तंबूत परतला.

Ajinkya Rahane And Cheteshwar Pujara
कोहलीसह पंतची सुट्टी; आता तरी ऋतूराजला संधी मिळणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com