कोरोनाविरुद्ध BCCI मैदानात; 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरची मदत

सध्या मेडिकल आणि आरोग्य सेवा या महत्वाच्या आहेत. त्यामुळे बीसीसीआयने आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला.
BCCI
BCCIFile photo
Summary

सध्या मेडिकल आणि आरोग्य सेवा या महत्वाच्या आहेत. त्यामुळे बीसीसीआयने आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona 2nd wave) देशभरात थैमान घातले आहे. संपूर्ण देश कोरोना महामारीशी झुंज देत आहे. जगभरातील अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. सामान्य नागरिकापासून उद्योजक, सेलेब्रिटी, खेळाडू हेदेखील आपापल्या परीने कोरोनाविरोधी लढ्यात खारीचा वाटा उचलत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मदतीचा हात पुढे केला आहे. (BCCI donate 10 litre 2000 oxygen concentrators to fight against Covid-19)

BCCI
द.आफ्रिका विश्वचषक जिंकू शकत नाही, दिग्गजानं सांगितलं कारण

कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी बीसीसीआयकडून ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्यात येणार आहेत. प्रत्येकी १० लीटरचे २ हजार कॉन्सेट्रेटर्स देण्याचा निर्णय बीसीसीआय घेतला आहे. काही दिवसांतच ही उपकरणे देशभरात वितरीत केली जातील. यामुळे गरजू रुग्णांना मदत होईल, तसेच महामारीविरोधात लढण्यासाठी बळ मिळेल, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी म्हटले आहे की, सध्या मेडिकल आणि आरोग्य सेवा या महत्वाच्या आहेत. त्यामुळे बीसीसीआयने आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला. यामुळे ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्सची कमतरता जाणवणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळेल. तसेच ते लवकर बरे होतील.

BCCI
WTC Final : 'आयपीएल स्थगित झाल्याचा टीम इंडियाला फायदा'

टीम इंडियातील खेळाडूंकडून मदत

मुंबई इंडियन्स संघाचा तडाखेबंद फलंदाज हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या या दोघांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्सची मदत याआधीच दिली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी ११ कोटींपेक्षा जास्त निधी जमा केला होता. तसेच इतर खेळाडूही आपापल्या परीने मदत करत आहेत.

अनिश्चित काळासाठी आयपीएल स्थगित

बायो बबलमध्ये राहूनही खेळाडू तसेच संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अनिश्चित काळासाठी आम्ही आयपीएल स्थगित केली आहे. येत्या काळात जर वेळ उपलब्ध झाला, तर त्या काळात उर्वरित स्पर्धा पार पाडू, असे आयपीएलचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले होते.

खेळाडूंच्या आरोग्याला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देत आलो आहोत. स्पर्धेशी संबंधित असलेल्या इतरांचीही सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असे बीसीसीआयने पत्रकाद्वारे जाहीर केले होते.

क्रीडा विश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com