
बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोर भूमिका स्वीकारली आहे. भविष्यात असा कोणताही अपघात होऊ नये, म्हणून बीसीसीआयने नवीन धोरण तयार करण्याची घोषणा केली आहे. यासाठी, बोर्डाने एक नवीन समिती स्थापन केली आहे. जी या प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल. शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि ही जबाबदारी ३ सदस्यीय समितीकडे सोपवण्यात आली आहे.