घरची ओढ; किंग कोहली बायोबबलमधून पडला बाहेर

Virat Kohli
Virat KohliSakal

Virat Kohli Break From Bio Bubble : वेस्ट इंडीज विरुद्धची टी-20 मालिका संपण्याआधीच विराट कोहली (Virat Kohli) घरी परतला आहे. बीसीसीआयने त्याला बायोबबलमधून सूट दिल्यानंतर तो घरी परतला असून तिसऱ्या सामन्यासह तो श्रीलंके विरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेपासून दूर राहणार आहे. बीसीसीआयने (BCCI) त्याला विश्रांती दिली असून तो 10 दिवसांचा ब्रेक घेणार आहे.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. दोन सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाने ही मालिका खिशात घातली. दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीनं अर्धशत झळकावले होते. आता तिसऱ्या टी-20 साठी तो संघाचा भाग नसेल. एवढेच नाही तर या मालिकनंतर भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध मालिका खेळणार आहे. टीम इंडियातील खेळाडूंचा बायोबबलमधील प्रवास कायम राहणार आहे. पण विराट कोहली याआधीच बायबोबलमधून बाहेर पडला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून विश्रांती घेतली आहे. 24 फ्रेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनऊच्या मैदानात रंगणार असून 26 आणि 27 फेब्रुवारीला धर्मशाला येथील सामन्याने टी-20 मालिकेची सांगता होईल. या मालिकेत भारतीय संघ विराटशिवाय मैदानात उतरेल.

Virat Kohli
राजवर्धननं वय लपवलं? BCCI च्या चौकशीत दोषी आढळला तर...

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाने मालिका जिंकली आहे. शनिवारी सकाळीच कोहली आपल्या घरी जाण्यासाठी निघला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी बीसीसीआयच्या पॉलिसीनुसार, विराट कोहलीला ब्रेक देण्यात आला आहे. वर्कलोड आणि मानसिक आरोग्यासाठी खेळाडूंना बायोबबलमधून ब्रेक देण्याची तरतूद आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

Virat Kohli
हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकाही रंगणार आहे. 4 मार्च ते 8 मार्च पहिला कसोटी सामना मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे. 12 ते 16 मार्च दरम्यान बंगळुरुच्या मैदानावर दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना रंगणार आहे. विराट कोहली पहिल्या सामन्यातून कमबॅक करणार की घरच्या मैदानावर 100 वी कसोटी खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com