
ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे.
नवी दिल्ली- ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला आहे. तब्बल 32 वर्षांनी हा योग घडून आला आहे. भारतीय क्रिकेट संघाने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर बीसीसीआयनेही संघाला गोड बातमी दिली आहे. बीसीसीआयकडून भारतीय संघाला 5 कोटींचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेटसाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. भारतीय संघाने असामान्य खेळाचे प्रदर्शन केले आहे, असं बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले आहे. तसेच त्यांनी भारतीय संघासाठी 5 कोटींचे बोनस जाहीर केले आहे. एनएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
BCCI has announced Rs 5 Crores as team bonus. These are special moments for India Cricket. An outstanding display of character and skill: BCCI Secretary Jay Shah
(Pic: Jay Shah Twitter)#AUSvsIND https://t.co/2a2AveGUYb pic.twitter.com/VVN6Clnmmk
— ANI (@ANI) January 19, 2021
भारताने औस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 328 धावांचे लक्ष्य दिले होते. चौथ्या दिवसाअखेर टिम इंडियाने बिन बाद 4 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने तीन विकेट्सनी जिंकला आहे. या सामन्याबरोबरच भारताने ही सिरीज 2-1 ने जिंकली आहे. पाचव्या दिवशी रोहित-शुभमनने संयमी खेळी करत खेळाला सुरुवात केली. पॅट कमिन्सने रोहितला माघारी धाडत टिम इंडियाला पहिला आणि मोठा धक्का दिला होता. रोहित शर्मा 21 चेंडूत 7 धावा करुन माघारी फिरला आहे. त्यानंतर युवा शुभमन गिलनं पुजाराच्या साथीनं डाव सावरला होता. गिलनं कसोटी कार्दितील दुसरे अर्धशतकही पूर्ण केले.