BCCI Selection Committee : टीम इंडियाचे सिलेक्टर व्हायचंय; ही आहे BCCI ने दिलेली कामांची लीस्ट

BCCI Selection Committee Responsibilities
BCCI Selection Committee Responsibilities ESAKAL

BCCI Selection Committee Responsibilities : बीसीसीआयने न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यावेळीच चेतन शर्मांच्या नेतृत्वातील पाच सदस्यांची निवडसमिती बर्खास्त केली. त्यानंतर बीसीसीआयने वरिष्ठ पुरूष संघाच्या पाच निवडसमिती सदस्यांसाठी अर्ज देखील मागवले. यामुळे चेतन शर्मांच्या नेतृत्वातील समितीला त्वरित घरी जावे लागणार आहे हे निश्चित झाले आहे. आता जी पाच सदस्यांची निवडसमिती निवडली जाणार आहे ती 60 वर्षाखालील असणार आहे. याबाबत बीसीसीआयने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या प्रसिद्धीपत्रकात इच्छुक अर्जदारांसाठी त्यांची निवडसमिती सदस्य म्हणून काय कर्तव्य असतील हे देखील सांगितले आहे.

BCCI Selection Committee Responsibilities
Manika Batra : मनिका बात्राने रचला इतिहास; टेबल टेनिस आशिया कप स्पर्धेत जिंकले कांस्य पदक

निवडसमिती सदस्य पदासाठी अर्ज करण्यासाठी निदान 7 कसोटी सामने किंवा 30 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने किंवा 10 वनडे सामने आणि 20 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळणे आवश्यक आहे. याचबरोबर त्याने क्रिकेटमधून 5 वर्षापूर्वी निवृत्ती घेतलेली असावी. अशा पात्र उमेदवारांनी 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे. तसेच अर्जदाराने बीसीसीआयशी सल्लग्नित क्रिकेट समितीत एकूण 5 वर्षे काम केलेले नसावे.

BCCI Selection Committee Responsibilities
महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

बीसीसीआय वरिष्ठ पुरूष संघाच्या निवडसमितीची कर्तव्ये

1 ) पारदर्शीपणे सर्वोत्तम संघनिवड करणे

2 ) वरिष्ठ पुरूष संघाची एक चांगली बेंच स्ट्रेंथ निर्माण करणे त्यासाठी प्लॅन करणे.

3 ) ज्या ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी टीम मिटिंगला उपस्थित रहावे लागले.

4 ) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी प्रवास करावा लागले.

5 ) संघाच्या कामगिरीचे मुल्यमापन करणारा रिपोर्ट तयार करणे आणि तो बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सिलला तिमाही बेसिसवर सादर करावा लागेल.

6 ) संघाच्या निवडीबाबत बीसीसीआय सांगेल त्यावेळी माध्यमांना संबोधित करणे.

7 ) प्रत्येक फॉरमॅटमध्ये कर्णधाराची नियुक्ती करणे.

8 ) बीसीसीआयचे नियम आणि अटींचे पालन करावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com