Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचे परतीचे सगळे दोर कापले; BCCI सूर्या, गिलबाबतही घेतयं मोठा निर्णय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI Central Contract Ajinkya Rahane

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचे परतीचे सगळे दोर कापले; BCCI सूर्या, गिलबाबतही घेतयं मोठा निर्णय?

BCCI Central Contract Ajinkya Rahane : बीसीसीआयने केंद्रीय कराराबाबत एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांना वार्षिक केंद्रीय करारातून वगळण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ आता बीसीसीआय कसोटी संघासाठीसुद्धा अंजिक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांच्या नावाचा विचार करणार नाहीये.

ही अंजिक्य, इशांतसाठी वाईट बातमी असली तरी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलसाठी उत्साह वाढवणारी बातमी ठरणार आहे. कारण या दोघांनाही बीसीसीआयने केंद्रीय करारात बढती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. याबाबतची अंतिम यादीवर बीसीसीआयच्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या अपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.

हेही वाचा: BCCI Selection Committee : व्यंकटेश प्रसादच्या गळ्यात पडणार निवडसमितीच्या अध्यक्षपदाची माळ?

बीसीसीआय भारतीय टी 20 संघाचा पुढचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड करण्याची शक्यता आहे. त्याला देखील ग्रुप C मधून ग्रुप B मध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या या अपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत 12 मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. यात भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकप, बांगलादेश दौऱ्यावर केलेल्या कामगिरीबाबतची चर्चा हा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला नाही. मात्र अध्यक्ष समाविष्ट मुद्द्यांव्यतिरिक्त दुसऱ्या मुद्द्यावर देखील चर्चा करू शकतात.

हेही वाचा: WTC Points Table: पाकिस्तानचे भंगले स्वप्न! भारताचं काय होणार, कसं आहे गणित?

बीसीसीआय भारतीय टी 20 संघाचा पुढचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड करण्याची शक्यता आहे. त्याला देखील ग्रुप C मधून ग्रुप B मध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या या अपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत 12 मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. यात भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकप, बांगलादेश दौऱ्यावर केलेल्या कामगिरीबाबतची चर्चा हा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला नाही. मात्र अध्यक्ष समाविष्ट मुद्द्यांव्यतिरिक्त दुसऱ्या मुद्द्यावर देखील चर्चा करू शकतात.

हेही वाचा: National Fencing Competition : हर्षवर्धन, श्रेयस, वैदेहीसह गायत्री, यशश्रीची आघाडी!

भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून भारतीय कसोटी संघापासून दूर आहेत. त्यांना खारब फॉर्ममुळे संघातून वगळण्यात आले आहे. आता त्यांचे संघात परतणे खूप अवघड असून बीसीसीआय देखील त्यांना नव्या केंद्रीय करार यादीतून वगळण्याची शक्यता दाट आहे. या यादीत भारताचा विकेटकिपर फलंदाज वृद्धीमान साहा देखील आहे. त्याला या वर्षाच्या सुरूवातीलाच त्याची पुन्हा भारतीय संघात निवड होणार नसल्याचे सांगण्यात आले होते.

केंद्रीय करारानुसार ग्रुप A+ मधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रूपये, ग्रुप A मधील खेळाडूंना 5 कोटी, ग्रुप B मधील खेळाडूंना 3 कोटी तर ग्रुप C मधील खेळाडूंना 1 कोटी रूपये मिळतात.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?