Venkatesh Prasad : व्यंकटेश प्रसादच्या गळ्यात पडणार निवडसमितीच्या अध्यक्षपदाची माळ?

BCCI Selection Committee Venkatesh Prasad
BCCI Selection Committee Venkatesh Prasadesakal

BCCI Selection Committee Venkatesh Prasad : बीसीसीआयने चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवडसमिती बर्खास्त करून आता अनेक दिवस झाले आहेत. बीसीसीआयने नव्या निवडसमितीसाठी अर्ज मागवले होते. त्यानंतरच नवी निवडसमिती कशी असेल याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत.

आता बीसीसीआयच्या नव्या निवडसमितीचा अध्यक्ष हा व्यंकटेश प्रसाद होण्याची दाट शक्यता आहे. ज्या लोकांनी नव्या निवडसमिती सदस्य पदासाठी अर्ज केला आहे त्यात सर्वाधिक चांगली प्रोफाईल ही व्यंकटेश प्रसादचीच आहे. बीसीसीआय याचबरोबर नव्या निवडसमितीमध्ये एक टी 20 स्पेशलिस्ट सदस्य देखील निवडायचा आहे.

BCCI Selection Committee Venkatesh Prasad
WTC Points Table: पाकिस्तानचे भंगले स्वप्न! भारताचं काय होणार, कसं आहे गणित?

भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हा 53 वर्षाचा आहे. त्याने भारताकडून 33 कसोटी आणि 161 वनडे सामने खेळले आहेत. त्याने 290 आंतरारष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. तो नव्या निवडसमितीसाठी अर्ज केलेल्यांपैकी सर्वात अनुभवी माजी खेळाडू आहे.

बीसीसीआयच्या शक्तीशाली व्यक्तींच्या जवळ असलेल्या सूत्राने 'या महिन्याच्या अखेरपर्यंत भारतीय वरिष्ठ संघाची नवी निवडसमिती निवडली जाईल आणि त्याची घोषणा देखील होईल. ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे. त्यात व्यंकटेश प्रसाद हा सर्वात अनुभवी माजी क्रिकेटपटू आहे. आता तरी अधिकृत चर्चा झालेली नाही. मात्र व्यंकटेश प्रसादच्या निवडसमिती अध्यक्षपदावर अनेक अधिकारी शिक्कामोर्तब करतील.'

BCCI Selection Committee Venkatesh Prasad
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचे परतीचे सगळे दोर कापले; BCCI सूर्या, गिलबाबतही घेतयं मोठा निर्णय?

व्यंकटेश प्रसाद निवडसमितीत दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करेल. तर पश्चिम विभागाचे सलिल अंकोला प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे. याचबरोबर पूर्व विभागाचे एसएस दास, उत्तर विभागातून मनिंदर सिंग, अतुल वासन, निखिल चोप्रा यांची नावे चर्चेत आहेत. मध्य विभागातून नयन मोंगिया यांचे नाव चर्चेत आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com