
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने विजय मिळवत तब्बल १८ वर्षांनी पहिलं वहिलं विजेतेपद पटकावलं. या विजयानंतर आरसीबीने बंगळुरूत विजयी रॅली काढली. पण या रॅलीला चेंगराचेंगरीच्या घटनेनं गालबोट लागलं. ११ जणांचा या रॅलीत चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी बीसीसीआयने कठोर पावले उचलली आहेत. काही गाइडलान्स तयार केल्या असून आयपीएल जिंकल्यानंतर कोणताही कार्यक्रम किंवा रॅलीसाठी बीसीसीआयकडून संघांना परवानगी घ्यावी लागणार आहे.