esakal | टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने सुरू केली प्रॅक्टिस; पण बीसीसीआयची ओढवली नाराजी!

बोलून बातमी शोधा

Shardul-Thakur

राज्य सरकारने रेड झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी खेळाडूंना रिकाम्या स्टेडियममध्ये व्यक्तिगत सरावास परवानगी दिली आहे.

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने सुरू केली प्रॅक्टिस; पण बीसीसीआयची ओढवली नाराजी!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित अथवा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे.

-  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मात्र यावेळेस चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले असून, यामध्ये क्रीडा संकुले आणि स्टेडियम खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून घरीच अडकलेल्या खेळाडूंना सरावासाठी परवानगी कधीपासून द्यावी यासंदर्भात सध्या क्रीडा संघटनांमध्ये विचारविनिमय चालू आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शार्दूल ठाकूर याने सरावाला प्रारंभ केला आहे. 

- यावर्षी ऑस्ट्रेलियात टी20 विश्वकप आयोजन होणे कठीण : मार्क टेलर

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्राची देखील वाताहत झाली आहे. कोरोनाच्या खबरदारीचा उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या चौथ्या सत्रात काही अटींसहित क्रीडा संकुले आणि स्टेडियम खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील क्रीडाक्षेत्राला थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच लॉकडाउन झाल्यापासून सर्वच खेळाडू सरावाकरिता मैदाने खुली करण्याची मागणी करत होते. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शार्दूल ठाकूर याने पालघर येथे सरावाला प्रारंभ केला आहे.

- सराव सुरु करण्याआधी रोहित शर्माला ‘फिटनेस टेस्ट’ द्यावी लागेल!

कोरोनाची खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घालून दिलेल्या नियमांचे पालन करत शार्दूल ठाकूरने सराव केल्याचे समजते. मात्र हा सराव सुरु करण्याअगोदर शार्दूल ठाकूरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली आहे. याव्यतिरिक्त पालघर, मुंबईचा भाग अजूनदेखील कोरोनाच्या संसर्गामुळे रेड झोन मध्ये आहे. राज्य सरकारने रेड झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी खेळाडूंना रिकाम्या स्टेडियममध्ये व्यक्तिगत सरावास परवानगी दिली आहे.

- विदेशी टी-२० लिग खेळण्याची परवानगी द्या, रॉबिन उथप्पाची ‘बीसीसीआय’कडे मागणी

दरम्यान, प्रेक्षकांशिवाय क्रीडा संकुले आणि स्टेडियम खेळाडूंच्या सरावासाठी खुली करण्यात आल्यानंतर, भारतीय गोलंदाज शार्दूल ठाकूर हा घराबाहेर पडून सराव करत असलेला पहिला खेळाडू ठरला आहे. मात्र, त्याच्या या निर्णयामुळे बीसीसीआय नाराज झाली आहे.