Roger Binny : मुलगा क्रिकेटर, सून स्टार अँकर, स्कॉटलंडशी BCCI अध्यक्षांचे आहे खास नाते

BCCI New President : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती.
bcci new president roger binny family details
bcci new president roger binny family detailssakal
Updated on

Roger Binny BCCI New President : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) नवा बॉस मिळाला आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी हे 36 वे अध्यक्ष बनले आहेत. आज मुंबईतील मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

bcci new president roger binny family details
Sunil Gavaskar : गावसकरांची भविष्यवाणी! 'हे' दोन संघ खेळणार टी 20 वर्ल्डकपची फायनल

रॉजर बिन्नी यांचे पूर्ण नाव रॉजर मायकल हम्फ्रे बिन्नी आहे. रॉजर हा भारतातील पहिला अँग्लो क्रिकेटपटू होता, जो स्कॉटलंडचा होता. परंतु भारतात जन्मला आणि मोठा झाला. त्याचे कुटुंब मूळचे स्कॉटलंडचे आहे. जे नंतर भारतात स्थायिक झाले. वडिलांप्रमाणेच मुलगा स्टुअर्ट बिन्नीही भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम स्पेल टाकण्याचा विक्रम स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर आहे. सुन मयंती लँगर ही टीव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. रॉजर बिन्नीने त्याच्या मित्राच्या बहिणीशी लग्न केले. सिंथिया आणि रॉजरने पहिली वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले. दोघांना तीन मुले आहेत.

bcci new president roger binny family details
BCCI New President : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती

1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा रॉजर बिन्नी महत्त्वाचा सदस्य होता. त्या विश्वचषकात त्याचे योगदान महत्त्वाचे होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. रॉजर बिन्नी या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. या स्पर्धेत त्याने आठ सामन्यांत एकूण 18 बळी घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com