
World Cup 2023 Tickets : यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये बीसीसीआयचा सावळा गोंधळ सुरूच असल्याचे त्यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. भारत - पाकिस्तान सामन्याची सर्व तिकीटे विकली गेल्याचा दावा फोल ठरल्याचा देखील हा पुरावा मानला जात आहे.
बीसीसीआयने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापूर्वीच आज भारत आणि पाकिस्तान सामन्याची 14000 तिकिटे उपलब्ध असल्याचे ट्विट केले. वर्ल्डकप सुरू होऊन दोन - चार दिवस झाले आहेत. या दोन-चार दिवसात स्टेडियम हे अर्धे रिकामे असल्याचे दिसून येत आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, 'बीसीसीआयने 14 ऑक्टोबर अहमदाबादमध्ये होणाऱ्या भारत - पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यासाठी 14000 तिकीटे रिलीज केली आहे.
तिकीटांची विक्री ही 8 ऑक्टोबर दुपारी 12 पासून सुरू होणार आहे. चाहते ही तिकीटे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन खरेदी करू शकतात.'
वर्ल्डकप 2023 चा इंग्लंड - न्यूझीलंड विरूद्धचा पहिल्या सामन्याची देखील तिकीटे सोल्ड आऊट झाली होती. मात्र जगातील सर्वात मोठे स्टेडियम निम्मे देखील भरले नव्हते.
अशीच परिस्थिती धरमशाला येथे देखील होती. 14000 क्षमतेचे मैदान अफगाणिस्तान आणि बांगलादेश सामन्यावेळी 30 टक्के रिकामेच होते.
दिल्लीतील नुतनिकरण झालेल्या अरूण जेटली स्टेडियमवरील कहानी देखील फार उत्साहवर्धक नाही. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यावेळी देखील जवळपास 40 टक्के सीट्स रिकाम्या पडल्या होत्या. यावरून आता बुक माय शो वर या सामन्यांची तिकीटे सोल्ड आऊट कशी दाखवत होती असा प्रश्न पडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.