IND vs AUS Rain : वर्ल्डकपमधील भारताच्या पहिल्याच सामन्यात पाऊस; कसं आहे चेन्नईचं हवामान?

IND vs AUS Rain
IND vs AUS Rainesakal
Updated on

IND vs AUS Rain : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आपला पहिला सामना आज ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नईत खेळणार आहे. हा सामना एम चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारताचे वर्ल्डकपूर्वीचे दोन्ही सराव सामने पावसामुळे वाया गेले आहेत. आजही भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे ढग दाटले आहेत.

वेदर अपडेटनुसार चेन्नईत गेल्या आठवड्यापासून थांबून थांबून पाऊस पडतणार आहे. सामन्याच्या दिवशी देखील ढगाळच वातावरण असण्याची शक्यता आहे. जाणून आजचं हवामान कसं असेल.

IND vs AUS Rain
World Cup 2023 Tickets : भारत - पाकिस्तान सामना हाऊसफुल की तिकीटं अजून अपलब्ध... BCCI च्या नव्या ट्विटने गोंधळले चाहते

अॅक्युवेदर रिपोर्टनुसार रविवारी चेन्नईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता जवळपास 20 टक्के आहे. वातावरण तसं स्वच्छ राहणार आहे. मात्र ठराविक अंतराने पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तापमान 25 ते 33 डिग्री राहण्याची शक्यता आहे.

यामुळे खेळाडूंना चांगलाच त्रास होण्याची शक्यता आहे. जसजसा सामना पुढे सरकेल तसतसं वातावरण थंड होण्याची शक्यता आहे. याचबरोबर दव देखील पडू शकते. यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक फार महत्वाची आहे. भारत - ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे थांबण्याची शक्यता फार कमी आहे.

IND vs AUS Rain
World Cup 2023 : भारताची वर्ल्डकप मोहीम आजपासून; पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यास रोहितची सेना सज्ज

सामना किती वाजता होणार सुरू?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. नाणेफेकीची वेळ ही 1 वाजून 30 मिनिटांची आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. या स्टेडियमवर फलंदाजांसाठी आणि गोलंदाजांसाठी देखील मदत मिळवते. त्यामुळे हा सामना संतुलित खेळपट्टीवर होणार आहे. सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध असल्याने तो रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com