रणजी ट्रॉफीत DRS साठी बीसीसीआयकडे पैसा नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI Not Using DRS In Ranji Trophy Because Of High Cost Says Former Indian Player

रणजी ट्रॉफीत DRS साठी बीसीसीआयकडे पैसा नाही?

बंगळुरू : भारतातील सर्वात प्रतिष्ठेची देशांतर्गत क्रिकेटमधील स्पर्धा रणजी ट्रॉफीची फायलन मुंबई आणि बंगळुरू यांच्यात होत आहे. मात्र या सामन्यात एक महत्वाची बाब समोर आली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या फायलनमध्ये डिसिजन रिव्ह्यू सिस्टम (DRS) चा वापरच केला जात नसल्याचे दिसून आहे. दरम्यान, भारताच्या एका माजी खेळाडूने DRS सिस्टम महाग आहे त्यामुळे खर्च वाढतो असे सांगत आश्चर्याचा धक्का दिला. (BCCI Not Using DRS In Ranji Trophy Because Of High Cost Says Former Indian Player)

हेही वाचा: VIDEO : सर्फराजचा अतरंगी स्कूप शॉट; रणजी ट्रॉफीत आयपीएलची झलक

बीसीसीआयने रणजी ट्रॉफी सेमी फायलन आणि फायनलमध्ये मर्यादित DRS पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न 2019-20 च्या रणजी हंगामात केला होता. यावेळी डीआरएसमध्ये हॉक आय आणि अल्ट्राएज यांचा वापर करण्यात आला नव्हता. दरम्यान, यंदाच्या हंगामात रणजी फायलनलमध्ये डीआरएस सिस्टम वापरलीच जात नाहीये. याचा फटका मध्य प्रदेशला पहिल्या डावात बसला आहे. मुंबईचा शतकवीर सर्फराज खान याला गौरव यादवच्या एका चेंडूवर पायचीत होण्यापासून जीवनदान मिळाले. याचा सामन्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

यावर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी 'आमचा अंपायर्सवर विश्वास आहे.' अशी प्रतिक्रिया दिली. भारताच्या माजी खेळाडूने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार 'डीआरएस ही महागडी गोष्ट आहे. यामुळे स्पर्धेचे बजेट वाढते. जर फायनलमध्ये डीआरएस नसला तरी काय फरक पडतो. आता आपल्या अंपायर्सवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. भारताचे दोन अव्वल अंपायर्स केएन अनंतपद्मनाभन आणि विरेंद्र शर्मा या सामन्यात अंपायरिंग करत आहेत. जर तुम्ही डीआरएस फायनलमध्ये वापरले तर तुम्हाला लीग स्टेजमध्येही ते वापरावे लागेल.'

हेही वाचा: 'एकमेवाद्वितीय धोनी' : आजच्या दिवशीच रचला होता इतिहास

बीसीसीआयला नुकतेच आयपीएलचे मीडिया राईट्स विकून 48,390 कोटी रूपये मिळाले आहेत. त्यामुळे डीआरएस खर्चिक म्हणणे रास्त होणार नाही. आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात डीआरएस वापरला जातोच.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'या उपकरणांची ने-आण करणे खूप खर्चिक आहे. हॉक आय म्हणजे तुम्हाला अजून जास्त कॅमेऱ्यांची गरज आहे. रणजी ट्रॉफी ही मर्यादित साधनांवर खेळली जाते. त्यावर अनेक जण म्हणतात की ज्या सामन्यांचे प्रक्षेपण होत आहे त्या सामन्यात तरी डीआरएस वापरावे. मात्र मर्यादित डीआरएस तुम्ही वापरू शकत नाही. गेल्यावेळी याचा वापर फक्त मर्यादित रिप्लेसाठी झाला. तेही एज आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला बॉल ट्रॅजेक्टरी वापरता येत नाही आणि हेच तंत्रज्ञान डीआरएसमधील सर्वात महत्वाचे तंत्रज्ञान आहे.'

Web Title: Bcci Not Using Drs In Ranji Trophy Because Of High Cost Says Former Indian Player

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top