VIDEO : सर्फराजचा अतरंगी स्कूप शॉट; रणजी ट्रॉफीत आयपीएलची झलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarfaraz Khan Scoop Shot Of Ranji Trophy Final Gone Viral

VIDEO : सर्फराजचा अतरंगी स्कूप शॉट; रणजी ट्रॉफीत आयपीएलची झलक

बंगुळूरू : मुंबई (Mumbai) विरूद्ध मध्य प्रदेश (Madya Pradesh) यांच्यात सुरू असलेला रणजी फायनल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने उपहारापर्यंत 8 बाद 351 धावांपर्यंत मजल मारली. यात झुंजार शतकी खेळी करणाऱ्या सर्फराज खानचा मोलाचा वाटा आहे. उपहाराला खेळ थांबला त्यावेळी तो 119 धावा करून नाबाद होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी मुंबईला तीन धक्के दिले. अशा प्रतिकूल परिस्थितीत सर्फराजने आक्रमक फलंदाजी करत मुंबईला 350 धावांचा टप्पा पार करून दिला. (Sarfaraz Khan Scoop Shot Of Ranji Trophy Final Gone Viral)

हेही वाचा: 'एकमेवाद्वितीय धोनी' : आजच्या दिवशीच रचला होता इतिहास

सर्फराज खानच्या याच आक्रमक खेळीची झलक दाखवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सर्फराज खान कसोटीत क्रिकेटमध्येही आयपीएलची झलक दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओत शतकाच्या जवळ पोहचलेला सर्फराज खान अनभव अग्रवालच्या एका वेगवान चेंडूवर स्कूप शॉट खेळताना दिसत आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्कूप करताना सर्फराज चक्क विकेटवर खाली बसला. या फटक्यावर सर्फराजला चौकार मिळाला आणि तो 92 धावांपर्यंत पोहचला.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याऱ्या मुंबईने पहिला दिवस संपला त्यावेळी 5 बाद 248 धावा केल्या होत्या. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी सर्फराज खान 40 तर शम्स मुल्लानी 12 धावा करून नाबाद होते. यानंतर दुसऱ्या दिवशी शम्स मुल्लानीला आपल्या धावसंख्येत एका धावेचीही भर घालात आला नाही. तो 12 धावांवर दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर सर्फराज खानने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या तुषार कोटियन 15 धावांची भर घालून माघारी परतला. दरम्यान सर्फराज खानने आपल्या धावांचा वेग वाढवला होता. त्याने मुंबईला 300 च्या पार पोहचवले.

हेही वाचा: Ranji Trophy : सर्फराजचे झुंजार शतक; मुंबईची मोठ्या धावसंख्येकडे कूच

मात्र त्याला समोरून म्हणावी तशी साथ मिळत नव्हती. अनुभवी धवल कुलकर्णी देखील 1 धावेची भर घालून माघारी परतला. दरम्यान, सर्फराज खानने जास्तीजास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवत शतकी मजल मारली. त्याने तुषार देशपांडेच्या साथीने उपहारापर्यंत मुंबईला 351 धावांपर्यंत मजल मारून दिली. उपहारानंतर मध्ये प्रदेशने मुंबईचा पहिला डाव 374 धावात संपुष्टात आणला. सर्फराज 134 धावा करून बाद झाला.

सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जैसवाल आणि कर्णधार पृथ्वी शॉने मुंबईला 87 धावांची सलामी देत चांगली सुरूवात करून दिली होती. पृथ्वी शॉने 47 धावांची तर रणजी ट्रॉफीत पाठोपाठ तीन शतके ठोकणाऱ्या यशस्वी जैसवालने 78 धावांची खेळी केली.

Web Title: Sarfaraz Khan Scoop Shot Of Ranji Trophy Final Gone Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top