bcci official confirms Rohit Sharma Virat Kohli Will Not Be Part Of India T20I Squad For New Zealand Series
bcci official confirms Rohit Sharma Virat Kohli Will Not Be Part Of India T20I Squad For New Zealand Seriessakal

IND vs NZ: BCCIचं ठरलं! रोहित-विराटचा टी-20 संघातून कायमचा पत्ता कट?

Published on

India vs New Zealand Series : भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ 27 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. याआधी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची संघात निवड होणार नाही. (Rohit Sharma Virat Kohli Will Not Be Part Of India T20I Squad For New Zealand Series)

bcci official confirms Rohit Sharma Virat Kohli Will Not Be Part Of India T20I Squad For New Zealand Series
Asia Cup 2023: आशिया कपबाबत जय शहांची मोठी घोषणा! भारत-पाकिस्तान आता...

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की, 'दुर्दैवाने न्यूझीलंड मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड किंवा विचार केला जाणार नाही. हे त्यांना संघातून बाहेर फेकण्यासाठी किंवा कशासाठी केले जात नाही, आम्हाला वाटते की भविष्यासाठी एक चांगला संघ तयार करणे आवश्यक आहे. बाकी निवडकर्ते काय निर्णय घेतात ते बघितले जाईल.

bcci official confirms Rohit Sharma Virat Kohli Will Not Be Part Of India T20I Squad For New Zealand Series
Asia Cup 2023: आशिया कपबाबत जय शहांची मोठी घोषणा! भारत-पाकिस्तान आता...

विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेचा भाग असतील परंतु हे दोन खेळाडू 27 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत खेळणार नाहीत.

न्यूझीलंड विरुद्ध भारत T20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला टी-20 - 27 जानेवारी, रांची

  • दुसरा टी-20 - 29 जानेवारी, लखनौ

  • तिसरा T20 - 01 फेब्रुवारी, अहमदाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com