रणजी ट्रॉफी स्थगित; देशांतर्गत क्रिकेटला लागले पुन्हा कोरोनाचे ग्रहण | Ranji Trophy Postpone Due To Increasing Corona Cases | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranji Trophy Postpone
रणजी ट्रॉफी स्थगित; देशांतर्गत क्रिकेटला लागले पुन्हा कोरोनाचे ग्रहण

रणजी ट्रॉफी स्थगित; देशांतर्गत क्रिकेटला लागले पुन्हा कोरोनाचे ग्रहण

नवी दिल्ली : भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases) झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक राज्यात नव्याने निर्बंध लागू केले जात आहे. भारतातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा फटका देशांतर्गत क्रिकेट (Domestic Cricket) स्पर्धांनाही पुन्हा एकदा फटका बसला आहे. बीसीसीआयने (BCCI) देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करुन रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) हंगाम, सी. के. नायडू ट्रॉफी आणि वरिष्ठ महिला टी २० लीग स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. (Ranji Trophy postpones Due To Increasing Corona Cases)

हेही वाचा: भारताला जे जमले नाही ते बांगलादेशने करुन दाखवले

रणजी ट्रॉफी (Ranji Trophy Postpone) आणि सी.के. नायडू ट्रॉफी ही या महिन्यात सुरु होणार होती. तर वरिष्ठ महिलांची टी २० लीग स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार होती. बीसीसीआयने खेळाडू, सपोर्ट स्टाफ, सामना अधिकारी यांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतला. त्यामुळे पुढची नोटिस येईपर्यंत या सर्व स्पर्धा स्थगित करण्यात येणार आहेत. मात्र बसीसीआय परिस्थितीचा आढावा घेत राहील आणि त्यानुसार स्पर्धा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

हेही वाचा: Ashes Live: चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी पावसाचा लपंडाव

बीसीसीआयने सर्व आरोग्य कर्मचारी, राज्य संघटना, खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि सामना अधिकारी यांचे कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच २०२१ - २२ च्या हंगामात ११ देशांतर्गत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान, ७०० पेक्षा अधिक सामने आयोजित करण्यात आले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top