भारताला जे जमले नाही ते बांगलादेशने करुन दाखवले | Bangladesh Record break Win Over New Zealand | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh Record break Win Over New Zealand
भारताला जे जमले नाही ते बांगलादेशने करुन दाखवले

भारताला जे जमले नाही ते बांगलादेशने करुन दाखवले

बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गतविजेत्या न्यूझीलंडला ८ विकेट्सनी पराभव केला. बांगलादेशने न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडला पहिल्यांदाच मात दिली. याचबरोबर बांगलादेशने (Bangladesh Cricket Team न्यूझीलंडचा बे ओव्हलवर पराभव करत मायदेशातील त्यांच्या १७ सामन्यांची अपराजित राहण्याची मालिका खंडित केली. दोन सामन्यांच्या मालिकेत आता बांगलादेश १ - ० ने आघाडीवर आहे. जरी न्यूझीलंडने (New Zealand Cricket Team) दुसरा कसोटी सामना जिंकला तरी मालिका बरोबरीत सुटणार आहे. बांगलादेशने एक कसोटी सामना जिंकत बरेच विक्रम केले आहेत. (Bangladesh Historical Win Over New Zealand)

हेही वाचा: KL राहुलही कोहलीसारखा तापट; आफ्रिकेच्या खेळाडूंनी अनुभवला राग

बांगलादेशने (Bangladesh) न्यूझीलंडचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Point Table) मोठी उसळी देखील घेतली. ते आता पाचव्या स्थानावर विराजमान झाले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पराभव करत पहिले विजेतेपद जिंकले होते. त्याच न्यूझीलंडचा बांगलादेशने त्यांच्याच देशात पराभव केला.

बांगलादेशने नववर्षातील पहिल्याच कसोटीत न्यूझीलंडमध्ये ४५८ धावांचा डोंगर उभारला. विशेष म्हणजे त्यांनी हा धावांचा डोंगर न्यूझीलंडच्या ३२८ धावांच्या प्रत्युत्तरात उभारला. यामुळे त्यांना पहिल्या डावात १३० धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर इबादत हुसैनने भेदक मारा करत न्यूझीलंडचा (New Zealand) दुसरा डाव १६९ धावात संपुष्टात आणला. इबादत हुसैनने ४६ धावात ६ विकेट्स घेतल्या. यामुळे बांगलादेशला विजयासाठी ४० धावांचे माफक आव्हान मिळाले. हे आव्हान बांगलादेशने दोन गड्यांच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक कसोटी विजय साकारला. (Bangladesh Record break Win Over New Zealand)

हेही वाचा: रहाणे-पुजारा जोडी जमली; दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाकडे आघाडी

बांगलादेशची एकाच सामन्यात रेकॉर्ड्सची मालिका

  • न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्धचा सर्व क्रिकेट प्रकारातील पहिला विजय.

  • १६ प्रयत्नानंतर न्यूझीलंडवरचा पहिला कसोटी विजय.

  • आयसीसी रँकिंगमधील पहिल्या पाच संघात समावेश असलेल्या संघाविरुद्ध पहिला कसोटी विजय.

  • ६१ कसोटी सामन्यातील ६ वा परदेशातील कसोटी विजय.

  • २०१७ पासूनचा न्यूझीलंडचा मायदेशात सलग आठ मालिका विजयांचा रथ रोखला.

  • घरच्या मैदानावर सलग १७ कसोटी सामने अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top