दादा म्हणाला, ''धोनीबाबत आमचं पण ठरलंय!''

वृत्तसंस्था
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

धोनी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आला होता, तेव्हा त्याला भवितव्याबाबत विचारण्यात आले होते. जानेवारीपर्यंत काही बोलू नका, असे उत्तर देऊन त्यानेही उत्सुकता ताणून धरली. 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी कधी एकदा निवृत्ती घेतोय, असं काहीजणांना झालं आहे. थोडे दिवस उलटले की कोणत्या ना कोणत्या कारणाने हा विषय चर्चेत येतच राहतो. आणि त्याच्या निवृत्तीच्या अंदाजांचे इमले बांधले जातात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या देशांविरुद्धच्या खेळण्यापेक्षा धोनीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठीही त्याला संघात स्थान दिले गेले नाही. त्यामुळे या चर्चेला पुन्हा सुरवात झाली. यावर आता भारताचा माजी महान कर्णधार आणि सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुली यांनी काही काळासाठी का होईना याविषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.  

''महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्यबाबत कोणीही चिंता करण्याची गरज नाही. आम्ही त्याबाबत ठरवलंय," असे सांगत गांगुली यांनी धोनीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. वेस्ट इंडीजविरुदध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठीही त्याचा विचार झालेला नाही. त्यामुळे धोनीचे नक्की काय चाललेय याबाबत तर्क-वितर्क करण्यात येत आहेत. 

- चौथ्या क्रमांकासाठी पर्याय सापडला; निवड समितीने केले शिक्कामोर्तब!

धोनीबाबतच्या या अफवांबाबत बोलताना गांगुली म्हणाले, ''येत्या काही महिन्यातच धोनीच्या भवितव्याबाबतची नक्की माहिती तुम्हाला कळेल. धोनीबरोबर आमची चर्चा झालेली आहे. धोनी हा अविश्वसनीय खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याबाबतच्या काही गोष्टी बंद दाराआड ठेवाव्या लागतात.''

- फ्युचर प्लॅनविषयी विचारले असता धोनी म्हणाला,...

दरम्यानच्या काळात धोनी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आला होता, तेव्हा त्याला भवितव्याबाबत विचारण्यात आले होते. जानेवारीपर्यंत काही बोलू नका, असे उत्तर देऊन त्यानेही उत्सुकता ताणून धरली. 

- युवा क्रिकेटपटूंनो, राहुल द्रविड सांगतोय मानसिक आरोग्याचे महत्त्व!

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी आम्ही संघ रचना तयार करत आहोत. रिषभ पंत हा प्रमुख यष्टीरक्षक असेल, परंतु तो जखमी झाला, तर दुसरा पर्याय आम्ही शोधत आहोत. ऐनवेळी गरज लागली तर धोनीचा पर्याय आम्ही खुला ठेवलेला आहे, असे मत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे निवड समितीही अजून वेट आणि वॉचच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI president Sourav Ganguly gives final verdict on MS Dhoni future