Sourav Ganguly in ICC | सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळाली मोठी जबाबदारी; वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sourav Ganguly

सध्या सौरव गांगुली BCCI च्या अध्यक्षपदी

सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळाली मोठी जबाबदारी; वाचा सविस्तर

Sourav Ganguly appointed chair of the ICC men’s cricket committee : ICC च्या पुरुषांच्या क्रिकेट समितीचे प्रमुख म्हणून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीकइन्फोने ही माहिती दिली असून गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरू होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी असलेल्या सौरव गांगुलीला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा हा बहुमान प्राप्त झाला आहे. या पदावर आधी भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे विराजमान होता. त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर गांगुलीची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला जास्तीत जास्त तीन वर्षे हे पद भूषवता येते. कुंबळे यांनी हा कार्यकाळ पूर्ण केला आणि ते पदावरून पायउतार झाले. त्याजागी गांगुलीने हे पद स्वीकारले आहे.

loading image
go to top