IPLमध्ये सामनाधिकाऱ्यांना मिळते एवढे मानधन; रक्कम पाहून चक्रावाल

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

आयपीएलमध्ये यंदाच्या वर्षांत सामनाधिकाऱ्यांना किती मानधन देण्यात आले हे जाहीर करण्यात आले आहे. ही रक्कम पाहून तुम्ही थक्क नाही झालात तरच नवल. 

नवी दिल्ली : कोणत्याही खेळात खेलाडू सर्वांत महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच त्यांना सर्वाधिक मानधन दिले जाते. मात्र, खेळाडूंप्रमाणेच पंच आणि सामनाधिकारीही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यामुळेच इंजियन प्रीमियर लीगमध्ये सामनाधिकाऱ्यांना दिले जाणारे मानधन पाहून तुम्ही थक्क व्हाल.   

सामना कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावा म्हणून सामनाधिकारी जबाबदारीने काम पाडतात. पंचांसारखे ते मैदानावर दिसत नसले तरी मैदानाबाहेर त्यांचे काम प्रचंड मोठे असते. 

आयपीएलमध्ये खूप मोठ्या रकमेची उलाढाल केली जाते. खेळाडूंना मोठ्या मोठ्या रकमेने करारबद्ध केले जाते. तसेच आयपीएलमध्ये यंदाच्या वर्षांत सामनाधिकाऱ्यांना किती मानधन देण्यात आले हे जाहीर करण्यात आले आहे. ही रक्कम पाहून तुम्ही थक्क नाही झालात तरच नवल. 

गेल्या आठवड्यात 21 ऑगस्टला बीसीसीआयने सामनाधिकाऱ्यांच्या मानधनाचा तपशील जाहीर केला आहे. 

सामनाधिकाऱ्यांचे मानधन खालीलप्रमाणे :
- जवागल श्रीनाथ : रु.52,45,128 
- मनू नायर : रु.41,96,102
- व्हि. नारायणनकुट्टी : रु.32,96,938

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI Reveals Salary Details Of IPL Match Referees