Rohit Sharma : सगळे समाधानी! बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला दिला मोठा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Captaincy BCCI

Rohit Sharma : सगळे समाधानी! बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला दिला मोठा दिलासा

Rohit Sharma Captaincy BCCI : बीसीसीआयची बहुप्रतिक्षीत टी 20 वर्ल्डकप रिव्ह्यू मिटिंग मुंबईत अखेर पार पडली. ही बैठक बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बोलावली होती. या बौठकीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड हे देखील उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून रोहितच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र या रिव्ह्यू मिटिंगमध्ये बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला दिला सादिला.

हेही वाचा: Australian Cricket Team Coach : सराव सामन्याची गरज नाही ; मॅकडॉनल्ड

श्रीलंकेविरूद्धच्या वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. भारतीय टी 20 संघात यावेळी मोठे बदल करण्यात आले होते. हार्दिक पांड्याला टी 20 संघाचा कर्णधार करण्यात आले. तर संघातील अनेक वरिष्ठांना संघात स्थान देण्यात आले नाही. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर बीसीसीआय खूष नसल्याची चर्चा सुरू झाली. हार्दिक पांड्या टी 20 पाठोपाठ वनडेचे नेतृत्व देखील रोहित शर्माकडून खेचून घेणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

मात्र बीसीसीआयने सध्या तरी रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात नसल्याचे दिलासा दिला आहे. रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्याबरोबरच या रिव्ह्यू मिटिंगला माजी निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा, लक्ष्मण, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी देखील उपस्थित होतो.

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, 'रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणूनच काम करेल. रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याची कोणतीही चर्चा या बैठकीत झालेली नाही. तुम्ही कसोटी आणि वनडेचे रेकॉर्ड पाहा ते चांगलेच आहेत.' (Latest Sports News)

हेही वाचा: Team India : वर्ल्ड कप कसा जिंकायचा? रोहितच्या उपस्थितीत BCCIचे 'या' तीन निर्णयावर शिक्कामोर्तब

दरम्यान, बीसीसीआयने 2023 च्या वर्ल्डकपसाठी 20 खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 च्या वर्ल्डकपची रूपरेषा आखताना बीसीसीआयने रोहित शर्माला सामील करून घेतले होते. यावरूनच अनेक गोष्टी अधोरेखित होतात.

या बौठकीनंतर नवीन निवडसमितीबाबतही अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'सर्वात प्रथम चेतन शर्मांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केलाय असं सांगितलेलं नाही. भारत येत्या 10 महिन्यात वर्ल्डकप खेळणार आहे. चेतन शर्मा आणि हरविंदर यांचा उपयोग नव्या तीन नविडसमिती सदस्यांना होईल.'

मिळालेल्या माहितीनुसार पूर्व विभागाचे एसएस दास निवडसमिती अध्यक्ष होण्याच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे 21 कसोटी खेळण्याचा अनुभव आहे.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?