पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी; आठ महिन्यांची बंदी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

पृथ्वीचा खुलासा मान्य 
मुश्‍ताक अली स्पर्धेदरम्यान आपल्याला खोकला झाला होता त्यावेळी आपण त्यावरचे औषध घेतले होते. त्या औषधार बंदी असलेले उत्तेजक असल्याची आपल्याला माहिती नव्हती, अजाणतेपणी आपल्या हातून हे कृत्य झाले. कामगिरी उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक आपण उत्तेजक घेतले नसल्याचा खुलाला पृथ्वीने बीसीसीआयच्या समितीसमोर केला त्याचा हा खुलासा मान्य करण्यात आला त्यामुळे त्याच्यावर आठ महिन्यांचीच बंदी घालण्यात आली. 

मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक करणारा त्या अगोदर 19 वर्षांखालील विश्वकरंडक जिंकून देणारा मुंबईचा हरहुन्नरी क्रिकेपटू उत्तेजक चाचणीत सापडला असून त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. खोकला झाल्यामुळे घेतलेल्या औषधात बंदी असलेले उत्तेजक द्रव्य असल्याचे शॉवरची मोठी कारवाई टळली तरिही त्याला आठ महिन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागणार आहे. 

इंदूरमध्ये झालेल्या मुश्‍ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत 22 फेब्रुवारी 2019 रोजी प्रृथ्वी शॉच्या मुत्राचे नमुने घेण्यात आले. त्याच्या या नमुन्यात टब्रुटालाईन हे निषिद्ध उत्तेजक सापडले आहे. उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधक नियमाचा भंग केल्यामुळे बीसीसीआयने ही कारवाई केली आहे. 

पृथ्वीचा खुलासा मान्य 
मुश्‍ताक अली स्पर्धेदरम्यान आपल्याला खोकला झाला होता त्यावेळी आपण त्यावरचे औषध घेतले होते. त्या औषधार बंदी असलेले उत्तेजक असल्याची आपल्याला माहिती नव्हती, अजाणतेपणी आपल्या हातून हे कृत्य झाले. कामगिरी उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक आपण उत्तेजक घेतले नसल्याचा खुलाला पृथ्वीने बीसीसीआयच्या समितीसमोर केला त्याचा हा खुलासा मान्य करण्यात आला त्यामुळे त्याच्यावर आठ महिन्यांचीच बंदी घालण्यात आली. 

16 मार्च 2019 पासून ही बंदी लागू होईल. 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत ही बंदी लागू असेल. त्यानंतर तो खेळू शकेल असे बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले. 
आठ महिन्यांची ही बंदी असली तरी पृथ्वी आपली संघटना किंवा क्‍लबमधील सरावाच्या सुविधांचा वापर बंदी संपण्याच्या दोन महिने अगोदरपासून म्हणजेत 15 सप्टेंबरनंतर करु शकेल, असे बीसीसीआयचा नियम सांगतो. 

पृथ्वी शॉवरची बंदी 15 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री संपत असल्यामुळे मायदेशात होणाऱ्या बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाविरुदधविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा विचार होणार नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI suspends Prithvi Shaw for doping violation