IND vs BAN: BCCI नं मारला कुऱ्हाडीवर पाय! 'या' खेळाडूला दिली आणखी एक संधी

कसोटी क्रिकेटमधील हा फ्लॉप शो असूनही या खेळाडूला बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली.
India vs Bangladesh
India vs Bangladeshsakal

India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एका खेळाडूला संधी देऊन बीसीसीआयने स्वतःच्या पायावर कुराड मारण्याचे काम केले आहे. हा फ्लॉप खेळाडू टीम इंडियातून वगळण्याच्या मार्गावर आहे, मात्र असे असतानाही बीसीसीआयने त्याला बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी दिली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्या सकाळी 9 वाजल्यापासून चितगाव येथे खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 च्या अंतिम फेरीचा मार्ग आणखी सोपा करण्यासाठी भारताला हे दोन्ही सामने जिंकावे लागतील.

India vs Bangladesh
PAK vs ENG : मुल्तानमध्ये मालिकेबरोबर पाकिस्तानची लाजही गेली; चाहत्यानेच केली PCB ची पोलखोल

बांगलादेशविरुद्धच्या या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत फ्लॉप क्रिकेटर शार्दुल ठाकूरला संधी देऊन बीसीसीआयने मोठी चूक केली आहे. शार्दुल ठाकूरला त्याच्या शेवटच्या 5 कसोटी डावात केवळ 4 विकेट घेता आल्या आहेत. फलंदाजीतही अष्टपैलू शार्दुल ठाकूरची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. शार्दुल ठाकूरला गेल्या 8 कसोटी डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. कसोटी क्रिकेटमधील हा फ्लॉप शो असूनही शार्दुल ठाकूरला बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली.

India vs Bangladesh
Aleem Dar VIDEO : DRS पाकिस्तानच्या विरोधात गेला म्हणून अलीम दार झाले नाराज, थर्ड अंपायरशी घातला वाद

आता बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शार्दुल ठाकूरसारख्या फ्लॉप खेळाडूला कोणत्या आधारावर संधी देण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धचे हे दोन कसोटी सामने चितगाव आणि ढाका येथील खेळपट्ट्यांवर खेळले जाणार आहेत. बांगलादेशमध्ये फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळते. शार्दुल ठाकूर हा एक मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत शार्दुल ठाकूरला संधी देणे टीम इंडियासाठी हानिकारक ठरू शकते.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय कसोटी संघ:

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद. उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com