
PAK vs ENG : मुल्तानमध्ये मालिकेबरोबर पाकिस्तानची लाजही गेली; चाहत्यानेच केली PCB ची पोलखोल
Pakistan Vs England 2nd Test Bird Poop On Seats : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी मुल्तान येथे खेळवण्यात आली. इंग्लंडने पहिल्या कसोटीप्रमाणे दुसरा कसोटी सामना देखील जिंकून मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने दुसरा सामना 26 धावांनी जिंकला. तर पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तानने मायदेशात सलग तिसरा कसोटी सामना गमावला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात देखील ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मात दिली होती.
हेही वाचा: Aleem Dar VIDEO : DRS पाकिस्तानच्या विरोधात गेला म्हणून अलीम दार झाले नाराज, थर्ड अंपायरशी घातला वाद
दरम्यान, पाकिस्तानने इंग्लंडविरूद्धची मालिका गमावालीच. खेळपट्टीवर त्यांच्यावर टीका होतच आहे. मात्र तब्बल 17 वर्षानंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी आलेल्या इंग्लंडसमोरच पाकिस्तानच्या स्टेडियमच्या खराब अवस्थेची पोलखोल झाली. दुसऱ्या कसोटीदरम्यान एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत मुल्तान स्टेडियमवरील बैठक व्यवस्थेसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर पक्षांची विष्ठा पडलेली दिसते. एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रेक्षकांच्या बसण्यासाठीची जागा देखील साफ केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा: PAK vs ENG : इंग्लंडने पाकला घरच्या मैदानात चारली पराभवाची धूळ! दुसरी कसोटी जिंकत रचला इतिहास
हा फोटो जियो टीव्हीच्या क्रीडा पत्रकाराने देखील सोशल मीडियावर शेअर केला. पत्रकाराने ही पोस्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमीझ राजा यांना देखील टॅग केली आहे. यावर रमीझ राजांनी किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
इंग्लंडने पाकिस्तानचा दुसऱ्या कसोटी देखील 27 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडने पाकिस्तानसमोर दुसऱ्या डावात विजयासाठी 355 धावांचे आव्हाव ठेवले होते. मात्र चौथ्याच दिवशी पाकिस्तानचा संपूर्ण संघ 328 धावात माघारी परतला. पाकिस्तानकडून सौऊद शकीलने 94 धावा करत झुंज दिली. मात्र मार्क वूडने पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडेच मोडले. त्याने दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या.
हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?