
नवी दिल्ली : क्रिकेटपटूंच्या मनमानीला आता लगाम लावण्यात येणार आहे. बीसीसीआयकडून याबाबतचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे यापुढे क्रिकेटपटूंच्या सामने निवडीचा अधिकार आता संघ व्यवस्थापनाकडेच असणार आहे. याचाच अर्थ सामन्यांच्या निवडीबाबत क्रिकेटपटूंच्या मर्जीला चाप लावण्यात येणार आहे.