बेन स्टोक्सच्या लहानपणी घडलेली धक्कादायक घटना उघड; भडकला तो

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

हानपणी त्याच्या आयुष्यात एक अत्यंत धक्कादायक प्रसंग घडला होता. त्याच्या जन्मापूर्वीच त्याची बहिण आणि भावाची हत्या करण्यात आली होती.  

लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा सध्या इंग्लंडमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तो इंग्लंडमध्येच नाही तर क्रिकेटजगात सर्वत्र त्याच्या खेळामुळे प्रसिद्ध आहे. मात्र, लहानपणी त्याच्या आयुष्यात एक अत्यंत धक्कादायक प्रसंग घडला होता. त्याच्या जन्मापूर्वीच त्याची बहिण आणि भावाची हत्या करण्यात आली होती.  

व्हॉट्सऍप प्रोफाईलला तरुणीचा फोटो ठेवून अश्‍लिल मेसेज करणाऱ्याला अटक

स्टोक्सचे बहिण आणि भाऊ यांच्या स्टोक्सच्या जन्मापूर्वीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 1988मध्ये स्टोक्सच्या जन्मापूर्वी त्याची आई डेब हीच्या एक्स बॉयफ्रेंडने त्याची आठ वर्षांची बहिण ट्रेसी आणि चार वर्षांचा भाऊ अँड्र्यू यांची गोळ्या घालून हत्या केली. 

रिचर्ड डन आणि डेब यांचा घटस्फोट झाल्यानंतर विकएंडला दोघेही मुले रिर्चडकडे असत तेव्हाच त्याने यांची हत्या केली आणि मग स्वत:वरही गोळी झाडून घेतली. त्यानंतर तीन वर्षींनी डेब आणि गेरार्ड स्टोक्स यांना बेन झाला. 

'त्यावेळी डेब अत्यंत विचित्र मनस्थितीत होती. बेनच्या जन्मामुळे तिला जगण्यासाठी एक नवीन आशा मिळाली,'' अशी माहिती सूत्रांनी दिली.  मात्र ही माहिती प्रसिद्ध केल्यामुळे स्टोक्स चांगलाच भडकला आहे. ही माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल त्याने The Sun ला चांगलेच सुनावले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ben Stoke Brother And Sister Were Killed By His Mothers ExBoyfriend