Video: शेवटचा वन-डे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच Ben Stokes ला अश्रू अनावर

मैदानावर पाऊल ठेवताना बेन स्टोक्सला आपल्या भावना आवरता आल्या नाही आणि त्याचे डोळे भरून आले.
ben stokes emotional
ben stokes emotionalsakal

Ben Stokes Retirement Emotional : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळल्या जात आहे. आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शेवटच्या वेळी मैदानात उतरलेल्या इंग्लिश अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी हा सामना खूपच खास आहे. त्याने 18 जुलैला एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा इंग्लंडचा संघ मैदानावर उतरत होता, तेव्हाचे वातावरण अतिशय भावूक झाले होते. मैदानावर पाऊल ठेवताना बेन स्टोक्सला आपल्या भावना आवरता आल्या नाही आणि त्याचे डोळे भरून आले. इंग्लंड क्रिकेटने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाव शेअर केला आहे.

बेन स्टोक्सने भलेही एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण तो टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे. बेन स्टोक्सची नुकतीच इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेन स्टोक्स पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. यानंतर एजबॅस्टन कसोटीत स्टोक्सच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध संस्मरणीय विजय मिळाला.

बेन स्टोक्सने 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.44 च्या सरासरीने 2919 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने 87 डावात 41.79 च्या सरासरीने 74 बळी घेतले. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.03 होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com