.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
India at Paris Paralympic 2024 Live: भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आत्तापर्यंत चांगली कामगिरी करता आली आहे. ऍथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडू चमकले आहेत. मंगळवारी महाराष्ट्राची भाग्यश्री जाधवही महिला गोळाफेक F34 प्रकरात सहभागी झाली होती.
मंगळवारी ती या प्रकारातील अंतिम फेरी खेळली. मात्र तिचं पदक अगदीच थोड्या फरकाने हुकलं. भाग्यश्री या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर राहिली. भाग्यश्रीने सर्वोत्तम ७.२८ मीटर लांब गोळा फेकला.
या स्पर्धेत अव्वल क्रमांकावर राहिलेल्या चीनच्या लिजुआनने ९.१४ मीटर लांब गोळा फेकत सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर पोलंडच्या लुसिना कोर्नोबिसने ८.३३ मीटर लांब गोळा फेकत रौप्यपदक जिंकले, तर कांस्य पदक मोरोक्कोच्या साईदा अमौडी हिने जिंकले. तिने ७.८० मीटर लांब गोळा फेकला.
त्यामुळे त्याच्या आणि भाग्यश्रीच्या अंतरामध्ये केवळ ५२ सेंटीमीटरचा फरक राहिला. चीनची सायुन झौ ७.५२ मीटर अंतरासह चौथ्या क्रमांकावर राहिली.