Team India चे 'हे' दोन प्रशिक्षक पुन्हा करु शकणार नाहीत अर्ज I Team India Coach | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shastri
टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टीम इंडियाला या स्पर्धेनंतर नवीन कोचिंग स्टाफ शोधावा लागणार आहे.

Team India चे 'हे' दोन प्रशिक्षक पुन्हा करु शकणार नाहीत अर्ज

Team India Coach : टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टीम इंडियाला या स्पर्धेनंतर नवीन कोचिंग स्टाफ शोधावा लागणार आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकाळ संपत आला असून बीसीसीआयनं सर्व पदांसाठी जॉब अॅप्लीकेशन जारी केलेय. पण, असं मानलं जातं की टीम इंडियाचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर पुन्हा या नोकरीसाठी अर्ज करु शकणार नाहीत.

एका अहवालांनुसार, दोन्ही प्रशिक्षक आता कोणत्याही आयपीएल संघात सामील होऊ शकतात. बीसीसीआयनं जारी केलेल्या माहितीनुसार, कोचिंग पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असावं, असं नमूद केलंय. भरत अरुण यांचं वय 60 च्या आसपास आहे, तर श्रीधर यांचं वय 50 च्या जवळ आहे. मात्र, असं असूनही दोघेही पुन्हा पदासाठी अर्ज करणार नाहीत. असं मानलं जातंय, की दोघेही कोणत्याही आयपीएल संघाचा भाग बनू शकतात. परंतु, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा: भारत-पाक सामन्यामुळं सानिया मिर्झा घाबरली, घेतला 'हा' निर्णय

जेव्हा रवी शास्त्री टीम डायरेक्टर आणि नंतर टीम इंडियाचे हेड कोच म्हणून सहभागी झाले, तेव्हापासून भरत अरुण आणि आर. श्रीधर टीम इंडियाचा हिस्सा बनले आहेत. भरत अरुण यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत वेगवान गोलंदाज तयार केले आहेत. पण, आता त्यांची मुदत संपत आहे. सध्या माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हा टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक बनू शकतो, अशा बातम्या सतत येत आहेत. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. जर, राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला, तर पारस म्हाब्रे गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावू शकतो, अशी माहिती आहे.

Web Title: Bharat Arun As Shridhar Will Not Reapply For Coaching Position Bcci Head Coach Team India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..