

Sports
esakal
धुळे: दोंडाईचाचे (ता. शिंदखेडा) आजोळ असलेली महाराष्ट्राची कन्या भाविका अहिरे हिच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तिची १९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तिच्या या यशाने आजोळच्या दोंडाईचासह धुळे जिल्हा आणि राज्यात आनंदाचे वातावरण आहे.