Team India: कसोटीनंतर आता 'या' दिग्गज खेळाडूची ODI कारकीर्दही संपली! निवडकर्त्यांच्या अ‍ॅक्शनने खळबळ

Team-India
Team-IndiaSAKAL

India tour of West Indies 2023 : टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूचे कसोटीनंतर आता वनडे कारकीर्दही संपल्याचे दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली नाही. याआधी 2023 मध्ये न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याला संधी दिली नाही. अशा परिस्थितीत या खेळाडूची कसोटीनंतर एकदिवसीय कारकीर्द संपलेली दिसत आहे.

Team-India
Wrestlers Protest: पहिलवान आंदोलन करणार नाहीत हे कळल्यावर बृजभूषण सिंह हसले? पहा व्हायरल व्हिडिओ

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची वनडे कारकीर्द कसोटीनंतर संपली आहे. भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे 21 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. याशिवाय भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला.

2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच' ठरला होता, पण त्यानंतर त्याची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली.

Team-India
MS Dhoni : 'माय लव्ह...' साक्षी तिच्या शेजारी होती तरी एअर होस्टेसने धोनीला दिली चिठ्ठी अन्...

कसोटी क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद होता. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करून विकेट मिळवायचा आणि गरज पडेल तेव्हा फलंदाजीतून भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चांगली कामगिरी करत होता. भुवनेश्वर कुमारने 2018 मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात 63 धावा केल्या आणि 4 मोठ्या विकेट्सही घेतल्या.

मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट या घातक वेगवान गोलंदाजांनी आता भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले. याशिवाय जसप्रीत बुमराहही अजून यायचा आहे. हे सर्व वेगवान गोलंदाज आजकाल आपल्या झंझावाती कामगिरीने कहर करत आहेत. या गोलंदाजांमुळे भुवनेश्वर कुमारचे भारताच्या वनडे आणि कसोटी संघात पुनरागमन करणे आता अशक्य आहे.

भुवनेश्वर कुमार बहुतेक सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचे कारण बनला आहे. त्यामुळेच आता निवडकर्त्यांनी या खेळाडूलाही टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com