esakal | चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का; 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याने सर्व टीम क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

CSK_Dhoni_13_1.jpg

चेन्नई सुपरकिंग्जला आईपीएल 2020 पूर्वी मोठा झटका बसला आहे.

चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का; 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याने सर्व टीम क्वारंटाईन

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली-  चेन्नई सुपरकिंग्जला आईपीएल 2020 पूर्वी मोठा झटका बसला आहे. माध्यमातील बातम्यांनुसार चेन्नई सुपरकिंग्जच्या एका खेळाडूसह 12 सहकारी सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. खेळाडूचे नावे जाहीर झाले नसले तरी टीमसाठी ही वाईट बातमी आहे. चेन्नई सुपरकिंग्ज शुक्रवारी दुबईमध्ये सराव सुरु करणार होती, पण आता महेंद्रसिंह धोनीसह सर्व टीमला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 

आणखी एक आठवडा हॉटेलमध्ये राहणार बंद

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, चेन्नई सुपरकिंग्जच्या ज्या सदस्याला कोरोना झाला आहे तो फास्ट बॉलर असल्याचं सांगितलं गेलं आहे. शिवाय इतर 12 सदस्यांची कोरोना चाचणी घेतली असता त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे.  चेन्नई सुपरकिंग्जच्या सदस्यांना दुबईत पोहोचल्यानंतर कोरोना झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पूर्ण टीमला एक आठवड्यासाठी आणखी  क्वारंटाईटमध्ये ठेवण्यात येणार आहे. चेन्नईची टीम 21 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये पोहोचली होती आणि एक आठवड्यांच्या क्वारंटाईन पीरियडमध्ये होती. मात्र, आता त्यांना आणखी एक आठवढा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांना हॉटेलमध्येच क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

 चेन्नई सुपरकिंग्जच्या पूर्ण टीमची पुन्हा एकदा चाचणी घेतली जाणार आहे. बीसीसीआयने युएईमध्ये पोहोचल्यानंतर संपूर्ण टीमची तीनदा चाचणी करण्याचे निर्देश दिले होते.