
Billie Jean King Cup First Time in Pune: महाराष्ट्रात तब्बल २५ वर्षांनंतर होत असलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या बिली जीन किंग कप आशिया ओश निया गट १ महिला टेनिस स्पर्धेसाठी एमएसएलटीए आणि संपूर्ण पुणे शहर सज्ज झाले आहे. ही स्पर्धा ८ ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे टेनिस संकुलात रंगणार आहे.
एल अँड टी मुंबई ओपन महिला डब्ल्यूटीए स्पर्धा आणि पीएमआरडीए महा ओपन एटीपी चॅलेंजर स्पर्धा आयोजनाच्या यशानंतर महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने व एआयटीए, पीएमडीटीए यांच्या सहकार्याने आणखी एका जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे शहरांत आयोजन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत असल्याचे एमएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.