
GT vs PBKS IPL 2025: गतवर्षी कोलकाता नाइट रायडर्सला विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर आता आपले नेतृत्व कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध करण्यास सज्ज झाला आहे. या वेळी पंजाब किंग्सचे नशीब पालटण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे. या सामन्यातून गुजरातचा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्व गुणवत्तेकडेही लक्ष असणार आहे.
२०२० च्या मोसमात दिल्ली संघाचे नेतृत्व करताना त्यांना आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत नेणाऱ्या श्रेयसने गतवर्षी कोलकाताला तिसऱ्यांदा आयपीएल करंडक जिंकून दिला होता, परंतु कोलकाता संघाने त्याला कायम न राखल्यामुळे श्रेयस आता पंजाब संघात आहे. गेली १८ वर्षे विजेतेपदासाठी प्रयत्न करत असलेला पंजाबचा संघ अपयशाचा दुष्काळ संपवण्याची प्रतीक्षा करत आहे.