Maharashtra Din : वडापाव खाऊन दिवस काढणारा रोहित Hitman कसा बनला ? वाचा नागपूर कनेक्शन

रोहितला लहानपणी ऑफस्पिनर बनायचे होते. पण प्रशिक्षक दिनेशने जेव्हा त्याची शॉट्स खेळण्याची क्षमता पाहिली तेव्हा त्याने रोहितला फलंदाजीचा सल्ला दिला.
rohit sharma
rohit sharmagoogle

मुंबई : रोहित शर्मा मूळचा नागपूरचा. पण मुंबईत काका-काकींच्या घरी तो लहानाचा मोठा झाला. रोहितला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि तो गल्लीबोळात क्रिकेट खेळत असे. त्याची आवड पाहून त्याच्या काकांनी त्याला स्वतःच्या पैशांतून क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

१९९९ पासून रोहित शर्माने हिटमॅन बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. रोहितला लहानपणी ऑफस्पिनर बनायचे होते. पण प्रशिक्षक दिनेशने जेव्हा त्याची शॉट्स खेळण्याची क्षमता पाहिली तेव्हा त्याने रोहितला फलंदाजीचा सल्ला दिला.

रोहितचे आई-वडील डोंबिवलीत एका खोलीच्या घरात राहात होते. क्रिकेट प्रशिक्षणामुळे आठवड्यातून फक्त शनिवार किंवा रविवारी त्याला भेटता येत असे. (biography of indian cricketer rohit sharma hitman of team india)

rohit sharma
Maharashtra Din : सचिन तेंडुलकर : गल्ली क्रिकेटमधला पोऱ्या कसा बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देव ?

स्वत: रोहित शर्माने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या बालपणीच्या संघर्षाची आठवण करून दिली आहे आणि त्याने मुंबईत वडा पाव खाऊन दिवस कसे काढले हे सांगितले आहे.

रोहित म्हणतो की, मी प्रशिक्षक दिनेश यांना सांगितले होते की मला ते अकादमीचे शुल्क परवडत नाही, पण त्यांनी मला शिष्यवृत्ती दिली. त्यामुळे चार वर्षे मी एक पैसाही दिला नाही आणि क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.

रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल हा मैलाचा दगड ठरला. येथूनच रोहितने व्यावसायिक स्तरावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

रोहितची देशांतर्गत कारकीर्द

मार्च २००५ मध्ये, रोहित शर्माने ग्वाल्हेर येथे देवधर ट्रॉफीमध्ये मध्य विभागाविरुद्ध पश्चिम विभागाकडून पदार्पण केले. आपल्या पहिल्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने नाबाद ३१ धावा केल्यामुळे पश्चिम विभागाने २४ चेंडू बाकी असताना ३ गडी राखून विजय मिळवला.

त्याच वर्षी शर्माने उत्तर विभागाविरुद्ध १२३ चेंडूत नाबाद १४२ धावांची नाबाद खेळी खेळली आणि प्रकाशझोतात आला. यानंतर २००६-०७ साली मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये रोहितने धावांचा पाऊस पाडला. येथूनच त्याला २००७ साली टीम इंडियात एंट्री मिळाली.

रोहितने आत्तापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये १०६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८१२३ धावा केल्या आहेत आणि ३०४ लिस्ट ए सामन्यांमध्ये ११ हजार ६१८ धावा केल्या आहेत तर ३९५ टी-20 मध्ये १० हजार ४७० धावा केल्या आहेत.

पदार्पणात फलंदाजी मिळाली नाही

रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, २३ जून २००७ रोजी, त्याने पुण्याच्या मैदानावर आयर्लंडविरुद्ध प्रथमच टीम इंडियासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या २००७ फ्युचर कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचाही समावेश होता.

पदार्पणाच्या सामन्यात रोहितला फलंदाजी मिळाली नाही कारण भारताने हा सामना ९ गडी राखून जिंकला.

rohit sharma
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या मुलांचं शिक्षण किती झालंय माहितीये का ?

२००७ साली T20 विश्वचषकातील कामगिरी

यानंतर रोहित शर्माला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 ICC T20 विश्वचषकात स्थान मिळाले आणि त्यानंतर रोहितने मागे वळून पाहिले नाही.

रोहितने या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४० चेंडूत ५० धावांची नाबाद खेळी केली होती. आणि पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या होत्या. ज्याने भारताला विश्वचषक जिंकण्यात खूप मदत केली.

रोहीतने ४५ कसोटींमध्ये ३ हजार १३७ धावा, २३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९ हजार ३७६ धावा आणि १३६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३ हजार ६२० धावा केल्या आहेत. या तीन फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण ४१ शतके आहेत.

रोहीतचे विक्रम

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक २६४ धावा करणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे. त्याने हा विक्रम १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध केला होता.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने तीन द्विशतके झळकावली आहेत.

  • रोहितने २०१३ मध्ये बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०९ धावांच्या खेळीमध्ये १६ षटकार ठोकले होते.

  • वनडेमध्ये २९ शतके केली आहेत.

  • T20 आंतरराष्ट्रीय (३६२० धावा) मध्ये दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू.

  • आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक ४ शतके करण्याचा विश्वविक्रम.

  • रोहित शर्माने विराट कोहलीसोबत चार वेळा वनडेमध्ये २०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे, हा देखील एक विश्वविक्रम आहे.

  • विश्वचषकात पाच शतके झळकावणारा एकमेव फलंदाज, विश्वचषकातील सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर (६ शतके) नंतर त्याचे नाव घेतले जाते.

  • रोहित शर्माला २०१५ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि मेजर ध्यानचंद खेलरत्नने पुरस्काराने २०२० साली सन्मानित करण्यात आले.

  • रोहित शर्मा २०१९ मध्ये ICIC ODI प्लेयर ऑफ द इयर ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com