Hindu Lives Matters | बबिता फोगाट म्हणते, 'हा माझा हिंदूस्तान आहे, इथं हिंदूंचा जीव महत्वाचा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Leader And Wrestler Babita Phogat Statement About Hindu Lives Matters

बबिता फोगाट म्हणते, 'हा माझा हिंदूस्तान आहे, इथं हिंदूंचा जीव महत्वाचा'

नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगाट ही सोशल मीडियावर राजकीय भाष्य करण्यात अग्रेसर असते. तिने नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटचा संदर्भ लोकं उदयपूर येथे कन्हैयालाल हत्या प्रकरणाशी (Kanhaiyalal Murder Case) जोडत आहेत. बबिता फोगाटने ट्विट केले की, 'हा माझा हिंदूस्तान आहे, इथं हिंदूंचा जीव महत्वाचा'. हे ट्विट करत असताना बबिताने आपला फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला. तिने #HinduLivesMatters हा हॅशटॅग देखील वापरला.

विशेष म्हणजे बबिता फोगाट ही भाजपची नेता आहे. याचबरोबर तिने कुस्तीत भारताला 2014 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. याचबरोबर तिने 2010 आणि 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. बबिताने वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

हेही वाचा: Udaipur Murder Case : इरफान पठाणनंतर आता अमित मिश्राचं ट्विट

दरम्यान, राजस्थान मधील उदयपूरमध्ये कपडे शिलाईचे काम करणाऱ्या कन्हैया लालचा (Kanhaiyalal Murder Case) एका सोशल मीडिया पोस्टवरून खून (Udaipur Murder Case) करण्यात आला. यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मारेकऱ्यांनी कपडे शिवयला आल्याचा बहाणा करत कन्हैया लालचा गळा चिरला होता. या प्रकराणावर देशभरातील अनेक प्रसिद्ध लोकांनी आणि राजकारण्यांनी प्रतिक्रिया दिली. यावर आता भारताचा क्रिकेटपटू अमित मिश्राने (Amit Mishra) देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: ICC T20I Ranking : पाकच्या बाबर आझमने विराट कोहलीला टाकले मागे

अमित मिश्राने ट्विट (Tweet) केले की, 'उदयपूरमध्ये घडलेली घटना म्हणजे निव्वळ अराजकता आहे. एका धर्मावर आधारित सोशल मीडिया पोस्टवरून गरीब शिलाई काम करणाऱ्या व्यक्तीचा गळा कापून खून करण्यात आला. आता त्याच्या मानवाधिकाराचे काय? त्याच्या कुटुंबाचे काय? त्याच्या धर्माचे काय?'

Web Title: Bjp Leader And Wrestler Babita Phogat Statement About Hindu Lives Matters

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top