
Udaipur Murder Case : इरफान पठाणनंतर आता अमित मिश्राचं ट्विट
उदयपूर : राजस्थान मधील उदयपूरमध्ये कपडे शिलाईचे काम करणाऱ्या कन्हैया लालचा (Kanhaiyalal Murder Case) एका सोशल मीडिया पोस्टवरून खून (Udaipur Murder Case) करण्यात आला. यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मारेकऱ्यांनी कपडे शिवयला आल्याचा बहाणा करत कन्हैया लालचा गळा चिरला होता. या प्रकराणावर देशभरातील अनेक प्रसिद्ध लोकांनी आणि राजकारण्यांनी प्रतिक्रिया दिली. यावर आता भारताचा क्रिकेटपटू अमित मिश्राने (Amit Mishra) देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा: ICC T20I Ranking : पाकच्या बाबर आझमने विराट कोहलीला टाकले मागे
अमित मिश्राने ट्विट (Tweet) केले की, 'उदयपूरमध्ये घडलेली घटना म्हणजे निव्वळ अराजकता आहे. एका धर्मावर आधारित सोशल मीडिया पोस्टवरून गरीब शिलाई काम करणाऱ्या व्यक्तीचा गळा कापून खून करण्यात आला. आता त्याच्या मानवाधिकाराचे काय? त्याच्या कुटुंबाचे काय? त्याच्या धर्माचे काय?'
उदयपूरमधील घटनेनंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया येत आहेत. तर ज्या दोन लोकांनी कन्हैयालालचा गळा कापला त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा: Chris Gayle | 'या' साठीच ख्रिस गेलने आधी IPL मग CPL सोडले
मिळालेल्या माहितीनुसार कन्हैया लालच्या 8 वर्षाच्या मुलाने काही दिवसांपूर्वी भाजप नेता नुपूर शर्माच्या समर्थनात मोबाईलवरून चुकून पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर खूप वाद निर्माण झाले होते. कन्हैया लालला सतत धमक्या येत होत्या. याबाबत ते पोलिसात देखील गेले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणात काही विशेष केले नाही.
त्यानंतर काही दिवसांनी दोन युवक त्यांच्या दुकानात कपडे शिवण्याच्या बहाण्याने आले आणि त्यांनी कन्हैया लालवर हल्ला केला. या हत्याकांडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे उदयपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच शहरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. मृत कन्हैया लालच्या पत्नीने आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
Web Title: Cricket Amit Mishra Tweet About Udaipur Murder Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..