
संपत्ती लपवणं आलं अंगलट; माजी टेनिसपटूला तुरुंगवास
जर्मनीचे माजी टेनिसपटू बोरिस बेरक (Boris Becker) यांना लंडन कोर्टाने अडीच वर्षाचा तुरूंगवास ठोठावला आहे. शुक्रवारी बोरिस बेकर यांनी हजारो पाऊंडची संपत्ती लपवल्या प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीत त्यांना अडीच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जर्मनीचे बोरिस बेकर हे सहा ग्रँड स्लॅम विजेते टेनिसपटू आहेत.
जर्मनीच्या 54 वर्षाच्या बोरिस बेकर यांना 2017 मध्ये आपली आधीची पत्नी बार्बरा आणि विभक्त राहणारी पत्नी शर्लेल यांच्या खात्यात काही रक्कम ट्रन्सफर केली होती. याचदरम्यान बोरिस बेकर यांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते. या प्रकरणातच त्यांच्यावर संपत्ती लपवल्या प्रकरणी केस सुरू होती.
या प्रकरणात निकाल देणारे जज डेब्रोहा टेलर यांनी बोरिस बेकर यांना अडीच वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावताना सांगितले की, 'तुम्ही केलेल्या कृत्याचा तुम्हाला पश्चाताप नाही. याचबरोबर तुम्ही तुमचा गुन्हा देखील मान्य केलेला नाही. '