माणुसकी! स्टार क्रिकेटर सराव करताना हेलिकॉप्टर उतरलं मैदानात अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bangladesh premier league helicopter lands
खेळाडूंच्या प्रॅक्टिस सेशनवेळी अचानक मैदानात हेलिकॉप्टर उतरले. जाणून घ्या यामागचे कारण... #Cricket #CricketNews #BPL #SakalNews

माणुसकी! स्टार क्रिकेटर सराव करताना हेलिकॉप्टर उतरलं मैदानात अन्...

क्रिकेटच्या मैदानात महेंद्रसिंह धोनीनं मारलेला हेलिकॉप्टर 'शॉट' चांगलाच फेमस आहे. अलिकडे अनेक खेळाडू त्याची कॉपीही करताना पाहायला मिळते. यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडूंची अवस्था काय असते हे क्रिकेट चाहत्यांनी अनुभवले असेल. पण जेव्हा प्रत्यक्षात मैदानात हेलिकॉप्टर उतरते तेव्हा खेळाडूंची अवस्था काय होते याची अनुभूती बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेच्या दरम्यान आली.

खेळाडूंच्या प्रॅक्टिस सेशनवेळी अचानक मैदानात हेलिकॉप्टर उतरले. त्यानंतर मैदानात उडणाऱ्या धुरळ्यापासून वाचण्यासाठी खेळाडूंची एकच धावपळ सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीपीएल स्पर्धेत सहभागी मिनिस्टर ग्रुप ढाका संघातील (Minister Group Dhaka) खेळाडू चट्टग्राम एमए अजीज स्टेडियमवर सराव करत होते. ज्यावेळी हेलिकॉप्टर मैदानात उतरले त्यावेळी मिनिस्टर ग्रुप ढाका (Minister Group Dhaka) तील स्टार खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell), तमीम इक्बाल (Tamim Iqbal), मशरफे मुर्तजा सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. ही घटना रविवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजता घडली. सराव करणाऱ्या खेळाडूंना हेलिकॉप्टर मैदानात उतरण्याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांची धांदल उडाल्याचा पाहाया मिळाले.

हेही वाचा: आजच लस घ्या; अभिनेत्याकडून नदालच अभिनंदन तर जोकोविचला चिमटा

मैदानात जे हेलिकॉप्टर उतरले त्याचा वापर Air Ambulance च्या रुपात केला जात होता. एका गंभीर रुग्णासाठी हे हेलिकॉप्टर मैदानात उतरवण्यात आले होते. जिल्हा स्पोर्ट्स असोसिएशनला यासंदर्भात माहिती होती. पण बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League) आयोजक आणि मिनिस्टर ग्रुप ढाका संघाला याची माहितीच नव्हती. हेलिकॉप्टर स्टेडियमच्या पूर्वेला उतरणार होते. पण ऐनवेळी ते पश्चिमी दिशेला उतरले. त्याठिकाणी खेळाडू आधीपासूनच सराव करत होते.

हेही वाचा: IPL 2022 : जगातील सर्वात मोठ्या मैदानात रंगणार Playoffs चे सामने?

चट्टग्राम DSA शहाबुद्दीन शमीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, माणुसकीच्या भावनेतून आम्ही हेलिकॉप्टर मैदानात उतरवण्यास परवानगी दिली होती. क्रिकेट बोर्ड आणि ढाका टीमलाही यासंदर्भात सूचना केली होती. हेलिकॉप्टर पूर्वेला उतरणार होते पण ते स्टेडियमच्या पश्चिमेला उतरले. त्यामुळे खेळाडूंमध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला, असे ते म्हणाले.

Web Title: Bpl Cricket Bangladesh Premier League Helicopter Lands In Stadium While Andre Russell Tamim Iqbal Was Practicing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top