
आजच लस घ्या; अभिनेत्याकडून नदालच अभिनंदन तर जोकोविचला चिमटा
वर्षातील पहिली वहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा गाजवत राफेल नदालनं (Rafael Nadal ) विश्वविक्रम प्रस्थापित केला. पुरुष गटात सर्वाधिक 21 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा तो खेळाडू आहे. त्याच्यापाठोपाठ जागतिक क्रमवारीतील अव्वलस्थानी असलेला नोवाक जोकोविच (Novak Djokovic) आणि रॉजर फेडरर (Roger Federer) या दिग्गचांजा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेपूर्वी हे तिघेही 20-20 ग्रँडस्लॅमसह संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर होते. जोकोविच आणि फेडररच्या अनुपस्थितीत नदालने दशकभरानंतर ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकून दाखवत या दोघांना मागे टाकले.
टेनिस जगतासह क्रीडा वर्तुळात सध्या राफेल नदालच्या (Rafael Nadal ) विश्वविक्रमाची चर्चा सुरु आहे. त्यात आता लसीकरणाचा संदेश देणारी खास प्रतिक्रिया सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने फेसबुकच्या माध्यमातून एक फोटो पोस्ट केलाय. नदाल आणि नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांचा एक फोटो त्याने पोस्ट केलाय. या फोटोला त्याने खास कॅप्शन दिलंय. आजच लस घ्या (Get vaccinated today) या ओळीसह रणदीपनं नोवाक जोकोविचला टोला लगावत लस घेण्याचा सल्ला दिल्याचे दिसते.
हेही वाचा: IPL 2022 : जगातील सर्वात मोठ्या मैदानात रंगणार Playoffs चे सामने?
ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेत नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) दबदबा राहिला आहे. विक्रमी नऊ वेळा जोकोविचनं जेतेपद पटकावले आहे. यंदाच्या हंगामातही तोच प्रबळ दावेदार होता. पण कोरोना लस न घेतल्यामुळे तो स्पर्धेला मुकला. स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात जाऊन त्याच्यावर स्पर्धेआधीच मायदेशी परतण्याची वेळ आली. लस न घेण त्याला चांगलंच महागात पडले. विक्रमी 21 व्या ग्रँडस्लॅम जिंकण्याची त्याची संधी हुकली आहे.
हेही वाचा: फुटबॉलपटूनं गर्लफ्रेंडला ओठ तुटेपर्यंत मारलं; फोटो ऑडिओ क्लिप व्हायरल
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावे?
पुरुष गटात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम आता राफेल नदालच्या नावे झाला असला तरी सर्वाधिक वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवण्याचा पराक्रम हा महिला टेनिसपटूच्या नावे आहे. मार्गारेट कोर्ट (Margaret Court) या दिग्गज महिला खेळाडूनं 24 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. त्याच्यापाठोपाठ सेरेना विलियमसचा (Serena Williams) नंबर लागतो. तिच्या नावे 23 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याची नोंद आहे. जर्मन टेनिस स्टार स्टेफी ग्राफनं (Steffi Graf) 22 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवली आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेचा एकंदरीत विचार करता राफेल नदाल या तिघींच्यानंतर चौथ्या स्थानावर आहे.
Web Title: Get Vaccinated Randeep Hooda Reaction After Rafael Nadal 21 Grand Slams Novak Djokovic
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..