Shivneri Kabaddi Tournament 2026: टायब्रेकरमध्ये बीपीटीचा सनसनाटी विजय, उपांत्य फेरीत धडक!

BPT Enters Semi-Finals of Shivneri Kabaddi Tournament: शिवनेरी सेवा मंडळाच्या ५८ व्या कबड्डी महोत्सवात व्यावसायिक गटात बीपीटीने रिजनल स्पोर्ट्स बोर्डावर टायब्रेकरमध्ये सनसनाटी विजय मिळवला. या विजयासह त्यांनी उपांत्य फेरीत धडक दिली आहे.
Shivneri Kabaddi Tournament

Shivneri Kabaddi Tournament

Sakal

Updated on: 

Shivneri Kabaddi Tournament: शिवनेरी सेवा मंडळाच्या ५८ व्या कबड्डी महोत्सवातील व्यावसायिक गटात बीपीटीने टायब्रेकमध्ये रिजनल स्पोर्ट्स बोर्डावर सनसनाटी विजय मिळवित स्पर्धेच्या उपांत्यफेरती धडक दिली. उपांत्य फेरीत बीपीटीचा मुकाबला वेस्टर्न रेल्वेशी होईल.

व्यावसायिक गटात बीपीटी आणि रिजनल स्पोर्ट्स बोर्ड यांच्यातील सामना ३८-३८ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या टायब्रेकरमधिल पाच-पाच चढायांमध्ये बीपीटीने ९-३ अशी बाजी मारत विजय मिळवला. बीपीटीकडून चढाईत जयेश महाजन आणि पकडीत आकाश अरसूल यांनी प्रभावी कामगिरी केली. रिजनल स्पोर्ट्स बोर्डकडून चढाईत सुनील दुबळे आणि पकडीत शंकर गदाई यांनी प्रयत्न केले.

Shivneri Kabaddi Tournament
Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com