Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

Sejal Kamble Shines as Amar Hind Defeats Bharatmata: शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी महोत्सवात सेजल कांबळे आणि सलोनी नाक्तीच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर अमर हिंद मंडळाने भारतमाता संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला.
Shivneri Kabaddi Tournament | Amar Hind Mandal

Shivneri Kabaddi Tournament | Amar Hind Mandal

Sakal

Updated on: 

शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी महोत्सवात महिला गटात सेजल कांबळेच्या आक्रमक चढायांच्या चमकदार खेळाच्या जोरावर अमर हिंद मंडळाने भारतमाता महिला संघाचा ४५-३० असा १५ गुणांनी पराभव केला. सेजल कांबळेने चढाईत, तर सलोनी नाक्तीने पकडीत प्रभावी कामगिरी करत अमर हिंदच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारतमाता महिला संघाकडून पायल कांचनने चढाईत, तर दृष्टी कुंभारने पकडीत चांगला खेळ केला. मात्र, अमर हिंदने सामन्यावर वर्चस्व राखत विजय मिळवला.

Shivneri Kabaddi Tournament | Amar Hind Mandal
Shivneri Kabaddi Tournament : रुपाली ज्वेलर्स अन् मुंबई पोलिसांचे व्यावसायिक गटात दणकेबाज विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com