Brazil Football: ब्राझीलचा फुटबॉल संघ भारतात येणार? कोलकात्यात रंगू शकतो मेगा सामना; रिपोर्टने वाढवल्या चाहत्यांच्या आशा

Brazil football team to play in India: ब्राझीलचा राष्ट्रीय फुटबॉल संघ भारतात येऊन कोलकात्यात मैत्रीपूर्ण सामना खेळू शकतो, असा दावा ESPN Brazil च्या वृत्तात करण्यात आला आहे. या चर्चेची सविस्तर माहिती, संभाव्य सामना आणि अधिकृत घोषणेची प्रतीक्षा जाणून घ्या.
Brazil football team to play in India

Brazil football team to play in India

esakal

Updated on

Brazil football team to play in India: भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ब्राझीलचा राष्ट्रीय फुटबॉल संघ भारतात येऊन एक मैत्रीपूर्ण सामना खेळू शकतो. ESPN Brazil(ब्राझीलमधील क्रीडा आणि मनोरंजन वाहिनी) च्या वृत्तानुसार, हा सामना ऑक्टोबरच्या सुरुवातीला कोलकाता येथे होण्याची शक्यता आहे.

या वृत्तानुसार, ब्राझीलचा संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तीन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. त्यातील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. हे सामने २५ आणि २९ सप्टेंबर रोजी टाउन्सविले आणि ब्रिस्बेन येथे खेळवले जातील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com