esakal | Copa : नेयमारची हवा! ब्राझीलनं उडवला व्हेनेझुएलाचा धुव्वा
sakal

बोलून बातमी शोधा

 Brazil vs Venezuela

Copa : नेयमारची हवा! ब्राझीलनं उडवला व्हेनेझुएलाचा धुव्वा

sakal_logo
By
सुशांत जाधव

Copa America 2021 : फुटबॉल जगतातील प्रतिष्ठित अशा कोपा अमेरिका स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान ब्राझीलने व्हेनेझुएलाचा 3-0 असा धुव्वा उडवला. अ गटातील तगड्या संघ समजला जाणाऱ्या ब्राझीलकडून मार्क्विनहोस याने 23 व्या मिनिटाला पहिला गोल डागला. पहिल्या हाफमध्ये ब्राझीलने ही आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या हाफमध्ये व्हेनेझुएलाच्या संघातील खेळाडूने डॅनिलो धक्का दिल्यानंतर ब्राझालला पेनल्टी मिळाली. नेयमारने आपल्या हटके अंदाजात या संधीच सोन करुन संघाच्या आणि आपल्या खात्यात आणखी एका गोलची भर घातली. (Brazil kick off Copa America 3-0 victory over Venezuela Neymar edging closer to Peles record)

64 व्या मिनिटाला ब्राझीलने सामन्यावर 2-0 अशी मजबूत पकड मिळवली. त्यानंतर अखेरच्या मिनिटात नेयमारने अप्रतिमरित्या पास केलेला चेंडू गॅब्रिएल बार्बोसाने कोणतीही चूक न करता गोल पोस्टमध्ये डागला. 89 मिनिटाला केलेल्या तिसऱ्या गोलसह सलामीच्या सामन्यात ब्राझीलने व्हेनेझुएला मोठ्या फरकाने पराभूत करत गटातीलच नाही तर यंदाच्या स्पर्धेतील प्रमुख दावेदार असल्याची झलक दाखवून दिली.

हेही वाचा: EURO च्या इतिहासात पहिल्यांदाच दुसऱ्या हाफमध्ये गोलची बरसात!

हेही वाचा: EURO : स्टर्लिंगच्या जिवावर इंग्लंडने काढली क्रोएशियाची हवा

नेयमार दिग्गज पेलेंच्या विक्रमाच्या आणखी जवळ

पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतरित करत ब्राझीलकडून खेळताना नेयमारने आपल्या खात्यात 67 व्या गोलची नोंद केली. ब्राझीलकडून खेळताना त्याने गॅब्रियलला दिलेल्या पाससह 46 गोल डागण्यात मदत केली आहे. 106 सामन्यात त्याने हा आकडा गाठला असून कोपा अमेरिका स्पर्धेत त्याला ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू यांचा विक्रम खुणावत आहे. ब्राझीलकडून खेळताना पेले यांनी 91 सामन्यात 77 गोल केले आहेत. नेयमार या विक्रमापासून केवळ 11 गोल दूर आहे.

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अ गटात ब्राझील आणि व्हेनेझुएला या दोन संघाशिवाय कोलंबिया, इक्वेडोर आणि पेरु या संघांचा समावेश आहे. दुसरीकडे ब गटात अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली, उरुग्वे आणि पेराग्वे या देशाचे संघ सहभागी आहेत.

loading image