
ब्राझिलीय बॉडिबिल्डर आणि फिटनेस उद्योजक जोस मॅट्युस कोरिया सिल्वा याचा वयाच्या २८व्या वर्षी मृत्यू झाला. ब्राझिलियातील अगुआस क्लारास येथील जिममध्ये व्यायाम करताना त्याचा मृत्यू झाला. जोस बॉडिबिल्डींग क्षेत्रात नावाजलेला होता आणि त्याचा या क्षेत्रात चांगला आदर होता. तो दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप सारख्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रसिद्ध होता. जोसला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जिममध्ये आपल्या मित्रांसोबत व्यायाम करत असताना अचानक कोसळला.