esakal | कोलकातानंतर चेन्नईच्या गोटात कोरोना; तिघे पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

कोलकातानंतर चेन्नईच्या गोटात कोरोना; तिघे पॉझिटिव्ह
कोलकातानंतर चेन्नईच्या गोटात कोरोना; तिघे पॉझिटिव्ह
sakal_logo
By
नामदेव कुंभार

IPL 2021 : कोलकाता संघानंतर आता चेन्नई संघाच्या गोटातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चेन्नई संघातील तीन सपोर्ट स्टापला कोरोना झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. चेन्नई संघाचे सीईओ केसी विश्वनाथ, गोलंदाजी कोच एल. बालाजी आणि बस चालकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी सकाळी कोलकता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर्स यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज, सोमवारी होणारा आरसीबी आणि केकेआर सामना पुढे ढकलण्यात आला होता.

कोरोना काळात IPL स्पर्धा बायो-बबलमध्ये खेळवली जाते. त्यामुळे बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव होणं ही खूपच धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर उर्वरित आयपीएल सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आतापर्यंत आयपीएलचे 29 सामना झाले आहेत. आतापर्यत आयपीएल सामन्यात कोणतीही अडचण आलेली नाही. मात्र, सोमवारी कोलकाता संघातील दोन खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सामना पुढे ढकलण्यात आला. सुत्रांच्या रिपोर्ट्सनुसार, सीएसके संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी लक्ष्मीपती बालाजी आणि बस चालकचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संघातील एकाही खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नाही.

हेही वाचा: IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. गेल्या 15 दिवसांपासून दररोज तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. देशातील कोरोनाची स्थिती गंभीर असताना आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. याबाबत काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडिअमवरील काही कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आलाय. नुकताच येथे मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामना झाला होता. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यापैकी एकही कर्मचारी कामावर नसल्याची माहिती डीडीसीचे प्रमुख रोहन जेटली यांनी दिली.